Home /News /money /

Gold Price Today: सलग दोन दिवस सोने दरात घसरण, चांदीचा दर वधारला; तपासा आजचा भाव

Gold Price Today: सलग दोन दिवस सोने दरात घसरण, चांदीचा दर वधारला; तपासा आजचा भाव

Gold Price Today, 5th April 2022: सोने दरात आज मंगळवारी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे.

  नवी दिल्ली, 5 एप्रिल : सोने दरात आज मंगळवारी घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोनं 48 रुपयांनी स्वस्त झालं आहे. या घसरणीसह आज सोन्याचा दर 51485.00 वर ट्रेड (Gold Price Today) करत आहे. तर चांदीच्या किमती वाढल्या आहेत. चांदीच्या दरात किरकोळ 5 रुपयांची वाढ (Silver Price Today) झाली आहे. या वाढीसह चांदीचा भाव 66300.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 48189 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 52570 रुपये आहे. त्याशिवाय 20 कॅरेट सोन्याची किंमत 43808 रुपये आहे. सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचा भाव 67980 रुपयांवर ट्रेड करत आहे.

  हे वाचा - Petrol Diesel Prices Hike: 15 दिवसांत 13 वेळा पेट्रोल-डिझेल दरवाढ, तपासा मुंबई-पुण्यातील आजचा भाव

  दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दर 50 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 51,483 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदीचा काल सोमवारी भाव 187 रुपयांनी वाढला होता. या वाढीसह चांदीचा भाव 66,827 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

  हे वाचा - Multibagger Stock: बँकेत 10-12 वर्ष लागली असती, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांचे पैसे सहा महिन्यात डबल!

  कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

  पुढील बातम्या