नवी दिल्ली, 4 एप्रिल : भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांच्या तुलनेत आज सोने दरात सोमवारी घसरण झाली. तर चांदीचा भाव वधारला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोने दर 50 रुपयांनी कमी
(Gold Price Today) झाला आहे. तर चांदीच्या भाव 187 रुपयांनी
(Silver Price Today) वाढला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजने
(HDFC Securities) याबाबत माहिती दिली आहे.
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दर 50 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह 51,483 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 51,533 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.
आज दिल्ली सराफा बाजारात चांदी भाव 187 रुपयांनी वाढला. या वाढीसह चांदीचा भाव 66,827 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 66,640 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर -
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता -
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्ध संपल्यास सोन्याच्या मागणीत कमी येईल आणि किमती कमी होऊ शकतात. भारतीय बाजारात चांदी 66,550 रुपये ट्रेड करेल असा अंदाज आहे. तर सोनं 50,550 रुपये स्वस्त होऊ शकतं असा अंदाज एक्सपर्ट्सने वर्तवता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.