मुंबई, 26 ऑक्टोबर: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव (Gold rate) कोसळला. दिल्लीत सोमवारी 10 ग्रॅम सोन्याचा भावाची साधारण 51000च्या घरात होती. दुसरीकडे चांदीच्या किंमतीतही घट झालेली दिसून आली आहे. एक किलोग्रॅम चांदीची किंमत 753 रुपये होती. ऑगस्टमध्ये सोन्याचा भाव 56,200 प्रति 10 ग्रॅमपर्यंत वधारला होता. सोन्याचे भाव कमी होण्यामागे की महत्वाची कारणं आहेत. अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरामध्ये घट होत आहे. तसंच कोरोना व्हायरसमुळे आधीच जगात मंदीचं वातावरण आहे. त्यामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. भारतातील स्टॉक मार्केटचाही परिणाम सोन्याच्या भावावर होत असतो. त्यामुळे सध्या सोन्याचे भाव गडगडले आहेत.
सोन्याचे आजचे भाव (Gold Price, 26 October 2020)
दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याच्या भावामध्ये चांगलीच घट झाली आहे. मुंबईच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्यासाठी आज 52,970 रुपये मोजावे लागले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा आजचा भाव 1901 डॉलर असा आहे. दिवाळीमध्ये सोन्याचा भावात पुन्हा वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. दिवाळीमध्ये सोन्याचे भाव 53,000 हजारांच्या घरात जाऊ शकतात असं, जाणकारांचं मत आहे. डिसेंबरमध्येही सोन्याचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे.
चांदीची आजची किंमत( Silver Price, 26 October 2020)
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही घट झाली आहे. सराफा बाजारामध्ये चांदीचा आजचा भाव 51,093 रुपये प्रति किलोग्रॅम एवढा आहे. याआधीचा चांदीचे भावही गगनाला भिडले होते. चांदीचा भाव 62,761 रुपयांपर्यंत गेला होता.
शुक्रवारी स्वस्त झालं सोनं
सराफा बाजारात शुक्रवारी सोनं स्वस्त झालं होतं. तर, शुक्रवारी चांदीचे दर वाढले. सोन्याच्या किंमती 75 रुपयांनी घसरून 51,069 रुपये झाल्या होत्या. त्याचबरोबर चांदीचा दर 121 रुपयांनी वाढून 62 हजार 933 रुपये प्रति किलो झाले आहेत. यापूर्वी गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 51,144 रुपयांवर बंद झाले होते. गुरुवारी चांदीचा भाव 62,812 रुपये प्रतिकिलो होता.