Home /News /money /

Gold Price Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोने दरात घसरण, चांदी महागली; इथे तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: दोन दिवसांच्या तेजीनंतर आज सोने दरात घसरण, चांदी महागली; इथे तपासा लेटेस्ट रेट

मागील दोन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने दरात घसरण (Gold Price Today) झाली आहे.

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर : मागील दोन दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने दरात घसरण (Gold Price Today) झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज डिसेंबर डिलीव्हरी सोन्याच्या दरात 0.02 टक्के घसरणीची नोंद झाली. तर चांदीचा दर 0.14 टक्क्यांच्या (Silver price) तेजीसह ट्रेड करत आहे. आज सोन्याचा दर 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव 62,376 रुपये आहे. मागील वर्षी 2020 मध्ये याच काळात MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर होता. आज MCX वर सोन्याचा भाव 47,795 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आता सोनं जवळपास 8400 रुपये स्वस्त आहे.

    महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG Gas Cylinder च्या दरात मोठी वाढ

    मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

    पोस्ट ऑफिसमध्ये बचत करण्याचा विचार करताय? तर मग आधी हे वाचा, फायदा होईल

    अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या