मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price: सोने दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gold Price: सोने दरात घसरण, जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

 आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात (Gold Silver Price Today 11th October) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव वधारला आहे.

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात (Gold Silver Price Today 11th October) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव वधारला आहे.

आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात (Gold Silver Price Today 11th October) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव वधारला आहे.

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : सध्याच्या सणासुदीच्या काळात सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. सोनं फेस्टिव्ह सीजनमध्ये काहीसं स्वस्त झालं आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोने दरात (Gold Silver Price Today 11th October) काहीशी घसरण झाली आहे. तर चांदीचा भाव काहीसा वधारला आहे. सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 14 रुपये स्वस्त होऊन 46966 वर ट्रेड करत आहे. बुलियन मार्केटमध्ये 22 कॅरेट गोल्ड रेट 43021 रुपयांजवळ आला आहे. तर चांदी दर 295 रुपयांनी वाढून 61375 रुपये झाला आहे.

जागतिक कमकुवत संकेतांमुळे सोमवारी भारतीय बाजारात सोने दरात कमी आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंज MCX वर गोल्ड फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 46,937 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 61,737 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवसाय करत आहे.

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाअखेरीस सोनं रेकॉर्ड स्तरावर पोहोचू शकतं असा अंदाज आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा दर 50000 रुपयांवर पोहचू शकतो. त्यामुळे आता सोनं खरेदीसाठी चांगली वेळ आहे.

सोनं लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा जमा करा SBI च्या या योजनेत, होईल चांगली कमाई

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

आज पुन्हा पेट्रोल-डिझेल किंमतीत वाढ, मागील 10 दिवसांत इतकं महागलं इंधन

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today