Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही 1100 रुपयांनी उतरला; तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही 1100 रुपयांनी उतरला; तपासा लेटेस्ट रेट

भारतीय सराफा बाजारात मागील दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सोनं-चांदी (Gold-Silver Rates Today) काहीसं स्वस्त झालं आहे.

  नवी दिल्ली, 28 जानेवारी : भारतीय सराफा बाजारात मागील दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी सोनं-चांदी (Gold-Silver Rates Today) काहीसं स्वस्त झालं आहे. 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर (Gold Price Today) 47,777 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा दर (Silver Price Today) 61,652 रुपये आहे. सोन्याचा आजचा भाव - दिल्ली सराफा बाजारात आज शुक्रवारी सोन्याचा भाव 423 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला. या घसरणीसह सोन्याचा आजचा भाव 47,777 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा आजचा दर - दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या दरात आज 1,105 रुपयांची घसरण झाली. या कमी झालेल्या किंमतीसह आज चांदीचा भाव 61,652 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 62,757 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅमचा भाव जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावरह पोहोचला होता. आज सोन्याचा 47,777 रुपये प्रति 10 ग्रॅमसाठीचा दर आहे. 2020 च्या तुलनेत आता सोनं सर्वोच्च स्तरावरुन 8261 रुपयांहून अधिक स्वस्त मिळत आहे.

  हे वाचा - आता मोबाइलवर वाचता येणार देशाचं बजेट, डाउनलोड करावं लागेल सरकारचं हे App

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

  हे वाचा - नोकरी सोडा अन् सुरू करा 'हा' व्यवसाय,महिन्याला कमवाल 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे

  कोरोनाचा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या