Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; जाणून घ्या आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; जाणून घ्या आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

रुपयाच्या मजबूतीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर (Gold Price Today) 142 रुपयांच्या घसरणीसह 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

  नवी दिल्ली, 20 डिसेंबर : रुपयाच्या मजबूतीमुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोमवारी सोन्याचा दर (Gold Price Today) 142 रुपयांच्या घसरणीसह 47,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात सोन्याचा भाव 47,622 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरणीची नोंद झाली आहे. चांदी 615 रुपयांच्या घसरणीसह 60,280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. मागील सत्रात चांदीचा दर 60,895 रुपये प्रति किलोग्रॅम होता. HDFC Securities चे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपयाच्या मजबूतीमुळे दिल्लीत 24 कॅरेट सोने दरात 142 रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात काहीशी वाढ झाली आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोने दरात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील पंढरवड्यात दर 49,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  आता मोफत बदलून घ्या फाटलेल्या नोटा; परत मिळतील पूर्ण पैसे, जाणून घ्या प्रक्रिया

  मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

  PPF मध्ये गुंतवणूक करताय तर दरमाह 'या' तारखेला पैसे नक्की जमा करा, नुकसान टळेल

  अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

  पुढील बातम्या