Home /News /money /

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा काय आहे आजचा भाव

Gold Price Today: सोने दरात घसरण, चांदीचा भावही उतरला; तपासा काय आहे आजचा भाव

10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) आज 47,837 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 61,477 रुपये आहे.

    नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी : भारतीय सराफा बाजारात मागील काही दिवसांच्या तुलनेत बुधवारी सोने-चांदी स्वस्त (Gold-Silver Rates Today) झालं आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) आज 47,837 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव (Silver Price Today) 61,477 रुपये आहे. दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दरात 125 रुपयांची प्रति 10 ग्रॅम घसरण झाली. या घसरणीसह सोन्याचा भाव 47,837 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 339 रुपयांनी घसरला. या घसरणीनंतर एक किलो चांदीचा भाव 61,477 रुपयांवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 61,816 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

    हे वाचा - सोन्याचे दर जैसे थे! कमी नाही होणार Gold Rate; सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांची निराशा

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

    हे वाचा - फेब्रुवारी महिन्यात 13 बंद राहणार बॅंका; लवकरात लवकर पूर्ण करा बँकिंग कामं

    दरम्यान, कोरोना काळतही सोन्याची मागणी वाढल्याने भारतात 2021 मध्ये सोन्याचा व्यापार 797.3 टन इतका झाला. या नव्या वर्षातही वाढीचा कल कायम राहण्याची आशा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने (WGC) गोल्ड डिमांड ट्रेंड 2021 अहवालात सांगितलं, की 2020 मध्ये सोन्याची मागणी 446.4 टन वरुन 2021 मध्ये 78.6 टक्के वाढीसह 797.3 टन इतकी झाली.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या