नवी दिल्ली, 21 डिसेंबर : आज मंगळवारी सोने दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. रुपयाच्या मजबूतीमुळे मंगळवारी सोने दरात 172 रुपयांची घसरण झाली. या घसणीसह सोने दर 47,246 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मागील सत्रात सोने दर 47,418 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्याउलट चांदी 342 रुपयांच्या तेजीसह 60,508 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. मागील सत्रात चांदीचा दर 60,166 रुपये प्रति किलोग्रॅम होता.
मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 17 पैशांनी वाढून 75.73 रुपयांवर पोहोचला. रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत 31 पैशांनी वाढून 75.59 वर बंद झाला.
HDFC सिक्येरिटीजचे सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी COMEX वर सोन्याचा दर 0.36 टक्क्यांनी वाढून 1,797 डॉलर प्रति औंस झाला. सोन्याचा दर अद्यापही 1,800 अमेरिकी डॉलर प्रति औंस खाली ट्रेड करत आहे.
अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता -
जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर -
तुम्हाला जर सोन्या-चांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today