• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Gold Price today: सोने दरात मागील 4 महिन्यातील सर्वात मोठी घसरण; पाहा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price today: सोने दरात मागील 4 महिन्यातील सर्वात मोठी घसरण; पाहा आजचा लेटेस्ट रेट

MCX वर सोमवारी सोने दरात (Gold price today) 1.3 टक्क्यांची घसरण होऊन सोने दर मागील 4 महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर पोहोचला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 9 ऑगस्ट : आठवड्याच्या सुरुवातीला आज सोमवारी सोने-चांदी (Gold-Silver) दरात घसरणीची नोंद झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोमवारी सोने दरात (Gold price today) 1.3 टक्क्यांची घसरण होऊन सोने दर मागील 4 महिन्यांच्या सर्वात कमी स्तरावर पोहोचला आहे. आज सोनं 600 रुपयांच्या घसरणीसह 46,029 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदी (Silver price today) 1.6 टक्क्यांच्या घसरणीसह म्हणजेच 1400 रुपयांनी कमी झालं असून 63,983 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोने दर 4.4 टक्क्यांनी कमी झाला आहे. सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या सेमेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. दरम्यान, AUGMONT- EMI वर ज्वेलरी खरेदी करण्याचा पर्याय देतो. Augmont कडून EMI वर सोनं खरेदीचा पर्याय असून यासाठी सुरुवातीला 20 टक्के डाउन पेमेंट करावं लागेल. 20 टक्के पेमेंटनंतर EMI फिक्स्ड होतो. यासाठी ग्राहकांना कोणतीही अॅडिशनल कॉस्ट भरावी लागत नाही.

    पाच दिवस स्वस्तात मिळेल सोनं; पाहा कशी आणि कुठे कराल खरेदी

    अशी तपासा सोन्याची शुद्धता - सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक App तयार करण्यात आलं आहे. 'BIS Care app' असं या App चं नाव असून ग्राहक याद्वारे सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या App वर सोन्याची शुद्धताच नाही, तर यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. लायसन्स, रजिस्ट्रेशन, हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याची तक्रार करू शकतात. कोरोनाच्या संकटकाळात सोने दरात चढउतार सुरू आहे. लसीकरणारची प्रक्रिया जगभरात सुरू झाल्यानंतर अशाप्रकारे चढउतार अधिक प्रमाणात होत आहे. अशावेळी 25 कोटी डॉलरच्या क्वाडरिगा इग्नियो फंड सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला यांचं असं म्हणणं आहे, की सोन्याचे दर पुढील 3-5 वर्षात सध्याच्या दराच्या दुप्पट होतील. भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति तोळाचा स्तर पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
    Published by:Karishma
    First published: