Home /News /money /

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोनं स्वस्त, शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीचं संधी; चेक करा नवे दर

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेच्या आधी सोनं स्वस्त, शुभ मुहूर्तावर सोनं खरेदीचं संधी; चेक करा नवे दर

Gold Price Today: सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी MCX वर चांदीचा भाव 911 रुपयांनी घसरून 62,645 रुपये प्रति किलोवर आला.

    मुंबई, 2 मे : अक्षय्य तृतीयेला (Akshaya tritiya 2022) सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. उद्या म्हणजेच 3 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. यावर्षी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी आहे. या आठवडाभर सोन्याच्या किमतीत (Gold Rate today) चढ-उतार होताना दिसत आहे, त्यानंतर सोने थोड्या घसरणीसह बंद झाले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. अक्षय्य तृतीया आणि लग्नसराईचा हंगाम जागतिक बाजाराच्या दबावाखाली असतानाही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आजच्या व्यवहारात 51 हजारांच्या आसपास सोन्याची विक्री होत आहे. सोमवारी सकाळी, मल्टीकमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 1.21 टक्क्यांनी घसरून 51,128 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. या दरम्यान कालच्या किमतीच्या तुलनेत सोने 626 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याआधी व्यवहाराच्या सुरुवातीला सोन्याची फ्युचर्स किंमत 51,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडली होती. गेल्या काही सत्रांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यूएस फेड रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याचे संकेत यामागचे कारण आहे. देशात टप्प्याटप्प्याने सोने हॉलमार्किंग अनिवार्य होणार; घरातील जुन्या हॉलमार्किंग नसलेल्या दागिन्यांचं काय होणार? चांदीचा भावही 911 रुपयांनी घसरला सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही (Silver Price Today) आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी MCX वर चांदीचा भाव 911 रुपयांनी घसरून 62,645 रुपये प्रति किलोवर आला. कालच्या किमतीच्या तुलनेत चांदी 1.43 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. आजच्या व्यवहारात चांदीचा भाव 62,685 रुपये प्रति किलोवर उघडला गेला. जागतिक बाजारातही चांदीच्या दरावर विशेष परिणाम दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेत भाव कुठे पोहोचला? अमेरिकन फेड रिझर्व्हने व्याजदरात केलेली वाढ आणि डॉलरच्या मजबुतीमुळे जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात, सोन्याची स्पॉट किंमत 1,886.25 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आणि त्याची किंमत 0.61 टक्क्यांनी घसरली. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली आणि ती 0.60 टक्क्यांनी घसरली. तुमचं जन धन खातं आधार कार्डशी लिंक करा आणि मिळवा 1.3 लाखांचा फायदा, चेक करा प्रोसेस IMF च्या अंदाज पासून घसरण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमएफने म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात जागतिक अर्थव्यवस्था 3.8 टक्क्यांऐवजी 3.6 टक्के दराने वाढेल. यानंतर ब्रेंट क्रूडच्या किमतीत घसरण झाली आणि पिवळ्या धातूची मागणीही वाढली. IMF ने महागाई वाढण्याचा अंदाज देखील वर्तवला आहे, ज्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाली, कारण त्यांची मागणी मंदावली.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Investment, Money

    पुढील बातम्या