मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण; आज किती रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं?

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण; आज किती रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं?

Gold Price Today: सोन्याचा दर आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,053 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 17 ऑगस्ट : सोन्याच्या दरात काल झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर या सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र यानंतर सोन्याचा भाव 52 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढला. मात्र बुधवारी म्हणजे आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 52147 रुपये आहे. काल शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा दर 52,061 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 86 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडला आहे.

    CNG च्या दरात मोठी कपात, नवे दर आजपासून लागू; चेक करा मुंबई, पुणेसह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

    सोनं आजही स्वस्तच सोन्याचा दर आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,053 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदीच्या दरात वाढ आज चांदीचा दर 58005 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57721 प्रति किलोच्या दराने बंद झाली होती. अशा प्रकारे आज चांदीचा दर 284 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे.

    सरकारकडून आधार कार्डवर मिळतंय 5 लाखांचं कर्ज, व्हायरल मेसेजबाबत सरकारने काय म्हटलं?

    कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Money

    पुढील बातम्या