Home /News /money /

Gold Price: सोन्याच्या दरात आठवडाभरात घसरण, किती स्वस्त झालं सोनं?

Gold Price: सोन्याच्या दरात आठवडाभरात घसरण, किती स्वस्त झालं सोनं?

भारत सरकारने दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण आणि शुद्धतेसाठी हॉलमार्क ज्वेलरीची व्यवस्था केली आहे. त्याचे स्केल एक कॅरेट ते 24 कॅरेट पर्यंत आहे. 24 कॅरेट म्हणजेच 999 शुद्धतेचे सोने सर्वात शुद्ध मानले जाते.

    मुंबई, 19 जून : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत (Gold Price) या आठवड्याच्या अखेरपर्यंत घसरण झाली आहे. 13 जून (सोमवार) आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर 51,657 रुपये प्रति 10 ग्रॅम होता आणि आठवड्याच्या शेवटी त्याचा दर किरकोळ घसरून 51,185 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. अशाप्रकारे एका आठवड्यात सोन्याच्या भावात 466 रुपयांची घसरण झाली आहे. आठवडाभरात सोन्याचा दर 51 हजारांवर गेला. शुक्रवारी सोन्याच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली आणि 51 हजार रुपयांच्या पुढे सोन्याचे दर बंद झाला. गुरुवारी सोन्याचा भाव 50,861 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. RBI कडून 'या' बँकेचा परवाना सस्पेंड, तुमचंही बँकेत खातं असेल तर काय परिणाम होईल? सोनं किती महाग, किती स्वस्त? इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 24-कॅरेट सोन्याची किंमत 17 जून रोजी कमाल 51,169 रुपयांवर पोहोचली. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 50,964 रुपये होता. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर बघितला तर 1 जून रोजी सोन्याचा दर 51 हजार 469 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सोन्याच्या या सर्व किंमती कर न लावता मोजण्यात आल्या आहेत. सोन्यावर स्वतंत्रपणे जीएसटी भरावा लागतो. मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक; शिक्षण, लग्न खर्चाची चिंता राहणार नाही सोन्याचे दर फोनवर मिळवा IBJA सरकारी सुट्टी वगळता शनिवार आणि रविवारी दर जारी करत नाही. 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन सोन्याची किरकोळ किंमत जाणून घेऊ शकता. तुम्हाला एसएमएसद्वारे लेटेस्ट दरांची माहिती मिळेल. भारत सरकारने दागिन्यांमध्ये सोन्याचे प्रमाण आणि शुद्धतेसाठी हॉलमार्क ज्वेलरीची व्यवस्था केली आहे. त्याचे स्केल एक कॅरेट ते 24 कॅरेट पर्यंत आहे. 24 कॅरेट म्हणजेच 999 शुद्धतेचे सोने सर्वात शुद्ध मानले जाते. मात्र त्याचे दागिने बनवले जात नाहीत, कारण सोन्याचे हे रूप अतिशय मऊ आहे. त्यामुळे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या