मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली; दागिने खरेदीवर किती रुपयांची बचत होईल?

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली; दागिने खरेदीवर किती रुपयांची बचत होईल?

Gold Price Today : सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,232 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 ऑगस्ट: सोन्याचे भाव भारतीय सराफा बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घसरले आहे. तर चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली आहे. आज सोनं 51968 रुपये, तर 999 शुद्धतेचे एक किलो चांदी आज 57380 रुपये झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 51968 रुपये आहे. सोन्याचे दर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी 52019 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 51 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. उच्चांकी किमतीपेक्षा सोनं आजही स्वस्तच सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 4,232 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. पर्सनल लोन घेण्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा; डोळे झाकून कर्ज घेऊ नका, कर्जाच्या जाळ्यात अडकाल चांदी महागली आज चांदीचा दर 57380 रुपये प्रति किलोवर खुला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 57362 प्रति किलो दराने बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीचा दर 18 रुपये प्रति किलोच्या वाढीसह उघडला आहे. Repo Rate Hike: HDFC बँकेच्या कर्जदारांची चिंता वाढली; सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर- सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today

    पुढील बातम्या