मराठी बातम्या /बातम्या /मनी /

खूशखबर! बजेटच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात घसरण; चांदीची झळाळी मात्र कायम

खूशखबर! बजेटच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात घसरण; चांदीची झळाळी मात्र कायम

उद्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांना फायद्याची ठरेल.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 31 जानेवारी : गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळाला. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची किंमत वधारल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 131 रुपयांची घसरण झाली आहे. दुसरीकडे चांदीला मात्र झळाळी मिळत आहे. चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 89 रुपयांनी वाढ झाली आहे. गुरुवारीही चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. गुरुवारी चांदीचे दर 737 रुपयांनी वाढले होते.

सोन्याचे भाव घसरले

दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी (31 जानेवारी, 2020) सोन्याची किंमत प्रति तोळा 41 हजार 584 रुपयांवरुन 41 हजार 453 रुपयांपर्यंत घसरली आहे. गेले दोन दिवस सोन्याच्या दरामध्ये कमी-जास्त प्रमाणात चढउतार पाहायला मिळत आहे. गुरुवारी सोन्याचे भाव 400 रुपयांनी वाढले होते, तर बुधवारी मात्र सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत त्यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांना फायद्याची ठरेल. HDFC सिक्युरीटीच्या माहितीनुसार जगभरातील गुंतवणूकदार कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सतर्क आहेत. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते आहे.

2020 मध्ये कशी असेल सोन्याची मागणी

World Gold Council चे भारतातील मॅनेजिंग डायरेक्टर सोमसुंदरम पीआर यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सोन्याबाबत पॉलिसी राबवण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे सोन्यामधील गुंतवणुकीच्या व्यवहारात पारदर्शकता येईल. त्याचप्रमाणे 2020 मध्ये सोन्याची मागणी 700 ते 800 टन राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 15 जानेवारी 2020पासून सोन्यावर हॉलमार्क असणं अनिवार्य केलं आहे. सोमसुंदरम पीआर यांनी सांगितल्याप्रमाणे हॉलमार्किंगमुळे सोन्याची विश्वासार्हता आणखी वाढेल आणि त्याचा फायदा सोनेखरेदीसाठी होईल.

अन्य बातम्या

या बजेटमध्ये इनकम टॅक्समध्ये मिळणार मोठा दिलासा? आर्थिक पाहणी अहवालाचे संकेत

Budget 2020: वडिलांचं निधन झाल्यानंतरही हे अधिकारी करताहेत 'बजेट'चं काम

थालीनॉमिक्‍स : शाकाहारी भोजन करणारे 10 हजार रुपयांपेक्षा जास्त करतात बचत

First published:

Tags: Gold, Gold rate