सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या काय आहेत भाव

सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या काय आहेत भाव

बुधवारी संध्याकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. परिणामी देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजार बंद आहेत. सोन्याच्या बाजारावर देखील लॉकडाऊनमुळे मोठा परिणाम झाला आहे.बुधवारी संध्याकाळपर्यंत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय सोन्याची स्पॉट किंमतीमध्ये 0.08 टक्क्यांनी किंवा 1.27 डॉलरने घसरली परिणामी सोन्याची किंमत 1646.45 डॉलर प्रति औंस होती. बुधवारी संध्याकाळी चांदीची किंमत मात्र काहीशी वधारली होती. 15.07 डॉलर प्रति औंस एवढी चांदीची किंमत होती. चांदीच्या किंमतीत 0.05 डॉलरने वाढ झाली होती. देशभरात 21 दिवसांंचा लॉकडाऊन आहे. परिणामी देशातील सोन्याचे बाजार बंद आहेत.

(हे वाचा-लॉकडाउनमुळे 2.5 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता, या क्षेत्राला मोठा फटका)

गेल्या काही दिवसांपासून फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती वाढत होत्या. मात्र बुधवारी संध्याकाळी फ्यूचर मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी संध्याकाळी सोन्याची 5 जूनच्या वायदा किंमतीत 0.53 टक्के अर्थात 241 रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे वायदे बाजारात बुधवारी सोन्याची किंमत प्रति तोळा 44,840 रुपये इतकी होती. 5 ऑगस्टच्या वायदा किंमतीतही MCX मध्ये घसरणच आढळून आली. ही घसरण 164 रुपयांची आहे आणि त्यामुळे वायदे बाजारातील सोन्याची किंमत 45,066 प्रति तोळा इतकी आहे.

(हे वाचा-3 महिन्यांचा EMI थांबवण्यासाठी मागितला जातोय OTP, पोलिसांचं 'अलर्ट' राहण्याचं आवाहन)

सोन्याबरोबरच वायदा बाजारात चांदीच्या किंमतीतही घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. एमसीएक्समध्ये चांदीच्या किंमतीमध्ये बुधवारी मे 2020 च्या चांदीच्या किंमतीत 0.54 टक्क्यांनी किंवा 234 रुपयांची घसरण झाल्यामुळे 43,260 रुपये प्रति किलोग्राम एवढी चांदीची किंमत होती. त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या किंमतीतही वायदे बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 170 रुपयांची घसरण होत कच्च्या तेलाची किंमत बुधवारी संध्याकाळी 1894 रुपये प्रति बॅरलवर ट्रेंड करत होती

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 9, 2020, 11:25 AM IST

ताज्या बातम्या