Gold Rates: जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं! लग्नसराईच्या काळात खरेदीची सुवर्णसंधी, वाचा आजचे दर
Gold Rates: जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं! लग्नसराईच्या काळात खरेदीची सुवर्णसंधी, वाचा आजचे दर
Gold Price: तुम्ही जर लग्नासराईच्या (Wedding season) काळात सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे कारण सोन्यामध्ये घसरण पाहायला मिळते आहे.
नवी दिल्ली, 29 मे: जर तुमच्या घरी लग्नसराईची (Wedding season) घाई सुरू आहे आणि तुम्ही देखील सोने खरेदीचा (Buying Gold) विचार करत असाल तर सध्या तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. (Gold-Silver latest Rate). सराफा बाजारातील सोन्याचे भाव देखील कमी झाले आहेत. गेल्या चार दिवसात सोन्याची वायदे किंमत 550 रुपये प्रति तोळाने कमी झाली आहे. शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 354 रुपयांनी कमी झाले होते. याशिवाय एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरणीनंतर प्रति तोळा 48,300 रुपये होते. तर जुलैच्या डिलिव्हरीच्या चांदीची किंमत प्रति किलो 71,395 रुपये आहे.
सर्वोच्च स्तरावर 7900 रुपयांनी सोन्याचे दर कमी
गेल्यावर्षी सोन्यामध्ये जोरदार गुंतवणूक करण्यात आली होती. सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे गेल्यावर्षी गुंतवणुकीत वाढ झाली होती. ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति तोळा 56191 रुपये या सर्वोच्च स्तरावर होता. गेल्यावर्षी सोन्याने 43 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. जर सर्वोच्च स्तराशी तुलना केली तर सोन्याचे दर 25 टक्केने घसरले आहेत, सोन्याचे दर एमसीएक्सवर प्रति तोळा 48,300 रुपये आहेत, अर्थात सर्वोच्च स्तरापेक्षा 7900 रुपयांनी स्वस्त दरात सोनं मिळत आहे.
हे वाचा-पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती50000 हजार भाव गाठणार सोनं
तज्ज्ञांच्या मते सोन्याचांदीच्या किंमतीत आणखी तेजी येण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरस हे देखील सोन्याचे दर वाढण्यामागील एक कारण असू शकतं. या काळात एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते येणाऱ्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोन्याचे दर 50 हजारांपेक्षा जास्त होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर सध्याचा काळ योग्य आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.