मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rates Today: आजही उतरली सोन्याची झळाळी, आतापर्यंत 8000 रुपयांनी उतरले भाव

Gold Rates Today: आजही उतरली सोन्याची झळाळी, आतापर्यंत 8000 रुपयांनी उतरले भाव

Gold Price Today: यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 प्रति  तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर  48000 रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत. अर्थात सोन्याचे दर जवळपास 8000 रुपयांनी कमी झाले आहेत.

Gold Price Today: यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 48000 रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत. अर्थात सोन्याचे दर जवळपास 8000 रुपयांनी कमी झाले आहेत.

Gold Price Today: यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 प्रति तोळा या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 48000 रुपये प्रति तोळाच्या आसपास आहेत. अर्थात सोन्याचे दर जवळपास 8000 रुपयांनी कमी झाले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस व्हॅक्सिनबाबत (Coronavirus Vaccine) गेल्या काही दिवसांपासून सकारात्मक बातम्या समोर येत आहेत. याचा परिणाम सोन्याच्या किंतीवर होत आहे. आजही सोन्याचे दर (Gold Rates Today) उतरले आहेत. शुक्रवारी प्रति तोळा सोन्यामध्ये किरकोळ 43 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीचे भावही 60 हजारांच्या खाली स्थीर आहेत. व्यावसायिकांच्या मते ऑगस्टमध्ये सर्वोच्च स्तर गाठल्यानंतर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. गुरुवारी एमसीएक्सवर (MCX Multi Comodity Exchange) सोन्याचे भाव  48,600 रुपये प्रति तोळा होते. 7 ऑगस्ट रोजी सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च रेकॉर्ड स्तरावर होते. जवळपास चार महिन्यांच्या तेजीनंतर सोन्याचे दर कमी होत आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागात सोन्याची मागणी वाढली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे सोन्याची खरेदी वाढली आहे.  ग्राहकांची संख्या देखील वाढली आहे. जर अशा पद्धतीने सोन्याचे दर कमी झाले तर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या विक्रीमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मागणी वाढली आहे.

(हे वाचा-नोकरदारांसाठी बेस्ट आहेत या 4 LIC पॉलिसी, जीवन विम्याबरोबर मिळतील लाखो रुपये)

सोन्याचे नवे भाव (Gold Price, 27 November 2020)

दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ 43 रुपये प्रति तोळाने घसरण झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 48,142 रुपये प्रति तोळा झाले आहेत.  याआधीच्या सत्रात दर  48,185 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1810 डॉलर प्रति औंस झाले आहेत.

चांदीचे नवे  दर  (Silver Price, 27 November 2020)

एचडीएफसी सिक्‍योरिटीजच्या माहितीनुसार चांदीच्या किंमतीमध्ये आज देखील घसरण पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 36  रुपये प्रति किलोने उतरली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 59,250 रुपये झाले आहेत.  आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 23.29 डॉलर प्रति औंस आहेत.

का कमी होत आहेत मौल्यवान धातूच्या किंमती?

एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल (HDFC Securities Senior, Analyst - Commodities) आणि मोतीलाल ओसवालचे वीपी (रिसर्च) नवनीत दमानी यांच्या मते कोरोना लशीसंदर्भात समोर आलेल्या बातम्यामुळे सोन्याचांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. या काळात सोन्याबाबत सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आहे, कारण कोरोना लशीच्या बातम्यांमुळे जगभरात आर्थिक रिकव्हरी होत आहे.

(हे वाचा-सामान्यांना मोठा दिलासा! स्वस्त डाळ उपलब्ध व्हावी याकरता सरकार उचलणार मोठं पाऊल)

AstraZeneca ने कोव्हिड -19 लशीविषयी सांगितले की ही लस ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या भागीदारीने विकसित होत आहे. ही लस इतर कंपन्यांपेक्षा खूपच स्वस्त आहे त्याचप्रमाणे 90 टक्के प्रभावी आहे. या बातमीनंतर सोन्याची सुरक्षित गुंतवणूक मागणी कमी झाली आहे.

First published:

Tags: Gold, Gold and silver prices today