Home /News /money /

Gold Price Today: गेल्या 5 दिवसात 1500 रुपयांनी महागलं सोनं, तपासा आजचा प्रति तोळ्याचा भाव

Gold Price Today: गेल्या 5 दिवसात 1500 रुपयांनी महागलं सोनं, तपासा आजचा प्रति तोळ्याचा भाव

सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) पुन्हा एकदा तेजी यायला लागली आहे. एमसीएक्सवर (MCX gold price) सोन्याची वायदे किंमत 0.15 टक्के वाढल्याने दर 47,800 रुपये या स्तरावर पोहोचली आहे.

    नवी दिल्ली, 07 जुलै: सोन्याच्या किंमतींमध्ये (Gold Price Today) तेजी येऊ लागली आहे. गेले काही दिवस सातत्याने सोन्याच्या किंमती वाढत असल्याचं पाहायला मिळतं आहे.  एमसीएक्सवर (MCX gold price) सोन्याची वायदे किंमत 0.15 टक्के वाढल्याने दर  47,800 रुपये या स्तरावर पोहोचली आहे. तर चांदीचे दर 69505 रुपये प्रति किलो या स्तरावर आहेत. याशिवाय आधीच्या सत्राबाबत बोलायचे झाले तर सोन्यामध्ये 0.9 टक्क्यांची वाढ झाली होती, तर चांदीमध्ये 0.6 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. गेल्या पाच दिवसांत सोन्याचे दर 1500 रुपयांनी वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय मार्केटबाबत (Gold Rates in International Market) बोलायचे झाले तर याठिकाणी सोन्याचे दर आधीच्या सत्रात तीन आठवड्याच्या सर्वोच्च स्तरावर होते. यामुळे अमेरिकन ट्रेजरीमध्ये घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात 0.2 टक्क्याने वाढ होऊन दर 1,800.42 डॉलर प्रति औंस झाले आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये आलेल्या किरकोळ कमजोरीमुळे या मौल्यवान धातूच्या किंमती वाढण्यात मदत झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर आज दिल्लीमध्ये या शुद्धतेच्या सोन्याचा  भाव 50560 रुपये प्रति तोळा आहे. चेन्नईमध्ये हा दर 49250 रुपये, मुंबईमध्ये 47760 रुपये, कोलकातामध्ये  49760 रुपये, हैदराबादमध्ये 48710 रुपये तर लखनउमध्ये दर 50560 रुपये प्रति तोळा आहे. हे वाचा-केवळ 7-14 दिवसांसाठी SBI, PNB सह या बँकांमध्ये गुंतवा पैसे, मिळेल मोठा फायदा गेल्या महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 2700 रुपयांनी कमी झाले होते. आज सोन्यामध्ये वाढ झाली असलती तरीही ऑल टाइम हाय अर्थात सर्वोच्च स्तरापेक्षा सोन्याचे दर 9000 रुपयांनी कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये (Gold Rates in August 2020) सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. यावेळी सोन्याचे दर 56200 रुपये प्रति तोळाच्या आसपास होते. आतापर्यंत सोनं पुन्हा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचलं नाही आहे. का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्‍योरिटीज (HDFC Securities) चे सीनियर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरमध्ये कमजोरीमुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. यामुळे सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळाला आहे. तर मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हीपी कमोडिटी रिसर्च नवनीत दमानी यांनी अशी माहिती दिली आहे की डॉलरमधील घसरणीमुळे आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत पसरलेल्या भीतीमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

    पुढील बातम्या