नवी दिल्ली, 08 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत. आज 8 डिसेंबर रोजी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 816 रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीच्या दरातही भरभक्कम वाढ झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात 3,063 रुपये किलोने वाढ झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 48,614 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचे दर 61,298 रुपये प्रति किलो होते. जाणकारांच्या मते कोव्हिड-19 (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आल्याने भारतात सोन्याचांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 08th December 2020)
दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 816 रुपयांनी वाढ झाली आहे. यानंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याचे दर 49,430 रुपये प्रति तोळा झाले आहेत. याआधीच्या सत्रात सोमवारी दर 48,614 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1,864 डॉलर प्रति औंस झाले आहेत.
(हे वाचा-रेल्वेने बदलला तिकिट बुकिंगचा नियम, कोट्यवधी प्रवाशांवर होणार थेट परिणाम)
चांदीचे आजचे भाव (Silver Price on 08th December 2020)
चांदीच्या किंमतीमध्ये देखील आज जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आज दिल्लीतील सराफा बाजारात चांदी 3,063 रुपये प्रति किलोने महागली आहे. यानंतर चांदीचे भाव प्रति किलो 64,361 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर 24.52 डॉलर प्रति औंस आहेत.
(हे वाचा-BREAKING: राज्यातील या सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द, सभासदांमध्ये गोंधळ)
का वाढले सोन्याचांदीचे भाव
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडंट (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी यांच्या मते, कोव्हिड-19 च्या रुग्णात वाढ झाल्याने पुन्हा एकदा अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंतवणुकदारांनी केलेल्या खरेदीनंतर सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये तेजी आल्याने भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढले आहेत.