ऐकावं ते नवलंच! 'ती' दागिने चोरून गिळायची; डॉक्टरांनी पोटातून काढलं दीड किलो सोनं, 90 नाणी

West Bengal - बंगालमध्ये एक अघटित पाहायला मिळालं. एका महिलेच्या पोटातून सोन्याचे दागिने आणि नाणी काढली गेली.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 01:57 PM IST

ऐकावं ते नवलंच! 'ती' दागिने चोरून गिळायची; डॉक्टरांनी पोटातून काढलं दीड किलो सोनं, 90 नाणी

मुंबई, 25 जुलै : पश्चिम बंगालमध्ये एका महिलेच्या पोटातून इतके दागिने आणि नाणी काढली की डाॅक्टरांनाही धक्का बसला. एका डाॅक्टरनं सांगितलं की पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात सरकारी हाॅस्पिटलमध्ये एका महिलेच्या पोटातून दीड किलो दागिने आणि नाणी काढली गेली. ही महिला मनोरुग्ण आहे.

रामपूरहाटच्या सरकारी मेडिकल काॅलेज आणि हाॅस्पिटलच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्वास यांनी सांगितलं की, 26 वर्षाच्या महिलेच्या पोटातून 5 आणि 10 रुपयांची 90 नाणी काढली गेली. जास्त करून ही नाणी तांबे आणि पितळेची होती. तर काही सोन्याची होती.

LIC ची सर्वोत्तम पाॅलिसी, रोज फक्त 9 रुपये खर्च आणि लाखोंचा फायदा

या महिलेच्या आईच्या लक्षात आलं की घरातून दागिने गायब होतायत. चौकशी करताना ही महिला रडायला लागायची. तिच्यावर लक्षही ठेवलं गेलं. पण ती शिताफीनं सटकायची. गेले दोन महिने तिची तब्येत बिघडली. डाॅक्टरांच्या औषधाचाही उपयोग झाला नाही.

खूशखबर! 12 दिवसांनी झालं डिझेल स्वस्त, पेट्रोलच्या दरातही घसरण

Loading...

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलले छगन भुजबळ, म्हणाले...

जेवल्यानंतर उलटी करायची

गेले काही दिवस ती जेवल्यानंतर उलटी करायची. तिच्या आईनं सांगितलं की भावाच्या दुकानातून तिला नाणी मिळायची. या महिलेला हाॅस्पिटलमध्ये आणलं गेलं. डाॅक्टरांनी अनेक तपासण्या केल्या. मग तिचं ऑपरेशन करून पोटातली नाणी काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 01:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...