मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Personal loan घेण्यापेक्षा 'हे' पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी

Personal loan घेण्यापेक्षा 'हे' पर्याय सर्वात उत्तम, तुलनेत EMI असेल कमी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पर्सनल लोन घ्यायला काहीच हरकत नसते पण थोडा शांत डोक्याने विचार केला तर मात्र आपलंच त्यामध्ये नुकसान होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई : लग्न समारंभ असो किंवा एखादं मोठं संकट पैशांची अचानक चणचण भासली की तो कसा उभा करायचा हे सुचत नाही. अशावेळी मग आपल्याला कर्जाचा पर्याय उभा राहतो. सावकाराकडे कर्ज करणं थोडं धोक्याचं आणि जोखमीचं असतं. अशावेळी बँकेत बऱ्याचदा पर्सनल लोनसाठी अर्ज टाकला जातो.

पर्सनल लोन घ्यायला काहीच हरकत नसते पण थोडा शांत डोक्याने विचार केला तर मात्र आपलंच त्यामध्ये नुकसान होतं. हातात त्यावेळी पैसे मिळतात खरे पण नंतर हप्ते भरता भरता आपला जीव अर्धा होतो. याची जाणीव आपल्याला वेळ निघून गेल्यावर होते. तुम्ही अशी चूक करू नये यासाठीच आज आम्ही तुम्हाला असे काही पर्याय सांगणार आहोत ज्याची मदत घेऊन तुम्ही पैसे उभे करू शकता.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल लोन घेण्यापेक्षा इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही लोन घेऊ शकता. त्यासाठी व्याजदरही पर्सनल लोनच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे तुमची आर्थिक घडी विस्कटत नाही. तुम्हाला लोन भरणं शक्य होऊ शकतं. अगदीच समजा नाही शक्य झालं तर तुमच्याकडची ती वस्तू बँक जप्त करते.

पर्सनल लोन ऐवजी तुम्ही एफडीवर लोन, गोल्ड लोन, पीपीएफवर लोन किंवा अगदीच खूपच गरज भासली तर प्रॉपर्टी मॉर्गेजसारख्या लोनचे पर्याय निवडू शकता. यामध्ये तुम्हाला बँकेकडून व्याजदरही कमी लागतं. शिवाय EMI चे हप्ते देखील आपल्याला परवडणारे बसतात. त्यामुळे ओढाताण होत नाही.

एफडीवर लोन

तुमची ज्या बँकेत FD ची रक्कम आहे तिथे तुम्ही लोनसाठी FD वर अर्ज करू शकता. तुम्हाला FD वरील रकमेच्या 70 टक्के अमाउंट लोन म्हणून मिळू शकते. यावर साधारण 3 ते 6.50 टक्के व्याजदर असतं. बँकेच्या नियमानुसार आणि प्रत्येक बँकेनुसार ते बदलत जातं. तेच पर्सनल लोनवर तुम्हाला १०.२५ टक्के व्याजदर लावलं जातं.

गोल्ड लोन

तुमच्याकडे काही सोन्याचे दागिने असतील तर ते बँकेत ठेवून तुम्ही त्यावर लोन घेऊ शकता. गोल्ड लोनवर 7 ते 7.50 टक्के व्याजदर लावलं जातं. 3 वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांपर्यंत गोल्डवर लोन घेता येतं. तुम्ही बँकेकडे किती सोनं ठेवता त्यावर रक्कम अवलंबून असते. जर ती रक्कम भरू शकला नाहीत तर तुमचं सोनं ऑक्शनमध्ये विकलं जातं.

पीपीएफ लोन

तुम्ही जर पीपीएफसाठी पैसे ठेवत असाल तर तुम्हाला त्यावर लोन मिळतं. तुमच्या PPF खात्यावर तुम्हाला 25 टक्के रक्कम लोन म्हणून मिळते. तुम्हाला १ टक्का जास्त व्याज जमा करावं लागतं. म्हणजे पीपीएफवर 7.1 व्याजदर असेल तर त्यावर एक टक्के अधिक व्याज जमा करावं लागेल. लोन भरण्यासाठी तुम्हाला 36 महिन्यांचा अवधी दिला जातो.

प्रॉपर्टी मॉर्गेज

यामध्ये तुमचं घर, ऑफिस किंवा तुमच्याकडील जागेचे पेपर बँकेत गहाण ठेवून त्यावर लोन घेऊ शकता. जर निर्धारित वेळेत तुम्ही लोन पूर्ण केलं नाही तर त्यावर जप्ती येते. मात्र पर्सनल लोनपेक्षा या लोनवर लागणारं व्याज कमी असल्याने हा पर्याय चांगला मानला जातो.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan