Home /News /money /

Gold Loan पैसे उभारण्याचा सोपा मार्ग; कोणती बँक किती व्याज आकारते? चेक करा डिटेल्स

Gold Loan पैसे उभारण्याचा सोपा मार्ग; कोणती बँक किती व्याज आकारते? चेक करा डिटेल्स

Gold Loan: सर्वसाधारणपणे, सर्व बँका आणि वित्तीय संस्था सोने तारण ठेऊन कर्ज देतात. तुम्ही कर्ज म्हणून तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत घेऊ शकता. मात्र, ते सोन्याची शुद्धता आणि इतर निकषांवर अवलंबून असते.

    मुंबई, 16 जानेवारी : सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. याचा उपयोग शिक्षण, वैद्यकीय सुविधा, विवाह किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकतो. जलद पैशांच्या गरजांसाठी गोल्ड लोन (Gold Loan) हा सर्वात सोपा आणि उत्तम पर्याय आहे. कमी जोखमीमुळे, इतर कर्जांच्या तुलनेत ते सहज उपलब्ध आहे. कागदोपत्री कामही कमी आहे. सर्वसाधारणपणे, सर्व बँका आणि वित्तीय संस्था सोने तारण ठेऊन कर्ज देतात. तुम्ही कर्ज म्हणून तारण ठेवलेल्या सोन्याच्या किमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत घेऊ शकता. मात्र, ते सोन्याची शुद्धता आणि इतर निकषांवर अवलंबून असते. लवचिक योजना आणि कमी कालावधीमुळे गोल्ड लोनची मागणी वाढत आहे. Gold Price : आठवड्याभरात सोनं महागलं, सोन्यापाठोपाठ चांदीचाही भाव वधारला या बँकांमध्ये स्वस्त सोने कर्ज Bank Bazaar नुसार, फेडरल बँक 6.99 टक्के व्याजदराने सर्वात स्वस्त गोल्ड लोन देत आहे. पंजाब आणि सिंध आणि SBI मध्ये सोन्याचे कर्ज 7 टक्के व्याजाने उपलब्ध आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) 7.25 टक्के व्याजाने सोने कर्ज देत आहे, तर कॅनरा बँकेत हा दर 7.35 टक्के आहे. इंडियन बँक 8 टक्के आणि बँक ऑफ इंडिया (BOI) 8.40 टक्के दराने सुवर्ण कर्ज देत आहे. तुम्ही कर्नाटक बँकेकडून 8.49 टक्के, युको बँकेकडून 8.50 टक्के आणि एचडीएफसी बँकेकडून 8.50 टक्के व्याजदराने सुवर्ण कर्ज घेऊ शकता. यामध्ये कर्जाची रक्कम 5 लाख रुपये असून परतफेडीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. Union Budget 2022 : रेल्वे अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य अर्थसंकल्पात समावेश का झाला? गोल्ड लोन घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा BankBazaar नुसार, सोने कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही व्याज दर, कार्यकाळ आणि इतर तपशीलांची तुलना करावी. प्रक्रिया शुल्क, व्याज न भरल्यास होणारा दंड, मूल्यांकन शुल्क इत्यादींची तुलना केल्याचे सुनिश्चित करा. तसेच, कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सोन्याची सध्याची किंमत तपासा. सोन्यावरील कर्जाची मुदत किमान 3 महिने ते कमाल 48 महिने असू शकते. तुम्ही तुमच्या गोल्ड लोनसाठी निवडलेल्या मुदतीवर आधारित व्याजाची गणना करू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Gold, Loan, Money

    पुढील बातम्या