मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Hallmarking News: जून 2022 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग आवश्यक नाही? सरकारने दिलं हे उत्तर

Gold Hallmarking News: जून 2022 पर्यंत सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग आवश्यक नाही? सरकारने दिलं हे उत्तर

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर  (Gold Jewellery) हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य करण्यासाठीचा आदेश मागे घेतला आहे, असं वृत्त समोर आलं आहे. जाणून घ्या काय आहे या मेसेजमागील सत्य

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 24 जुलै: सरकारी योजना, सरकारी निर्णय याबाबत दिवसेंदिवस सोशल मीडियावर काही अफवा पाहायला मिळतात. सध्या असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर (Gold Jewellery) हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य करण्यासाठीचा आदेश मागे घेतला आहे. जाणून घ्या काय आहे या मेसेजमागील सत्य. हा मेसेज सध्या वेगाने व्हायरल होत आहे, याबाबत फॅक्ट चेक करण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) एक ट्वीट केलं आहे. सरकारने gold jewellery चं हॉलमार्किंग मागे घेतलं असल्याच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. काय आहे यामागील सत्य? एका पत्रासह बनावट हेडलाइनसह जोडून असा दावा केला जात आहे की, कोव्हिडमुळे हॉलमार्किंग जून 2022 पर्यंत थांबवण्यात आलं आहे.  PIBFactCheck ने हा दावा फेटाळला आहे. शिवाय त्यांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, भारत सरकारद्वारे 16 जून 2021 रोजी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आलं आहे. सरकारने म्हटले आहे की सोन्याच्या दागिन्यांची हॉलमार्किंग 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने राबविली जात आहे आणि हा नियम मागे घेण्यात येणार असल्याचं सांगणारं परिपत्रक बनावट आहे. सोन्याच्या दागिन्यांववर आणि कलाकृतींवर अनिवार्य हॉलमार्किंगचा नियम टप्प्याटप्प्याने लागू केला जात आहे. सरकारने पहिल्या फेजमध्ये 256 जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या नियमाअंतर्गत कोणत्याही व्यापाऱ्याला हॉलमार्किंग नसणारे कोणतेही दागिने विकता येणार नाहीत. हे वाचा-199 रुपयांत मिळेल CA ची सर्व्हिस, SBI ची खास ऑफर मिळवण्यासाठी काही तासच शिल्लक 256 जिल्ह्यात हॉलमार्किंगची सुरुवात सरकार टप्प्याटप्प्याने राबवत असलेल्या हॉलमार्किंगच्या नियमात सुरुवातील 256 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक जिल्हे तामिळनाडूमधील आहेत, याठिकाणी 24 जिल्ह्यात हॉलमार्किंग लागू केलं जात आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 23, महाराष्ट्रातील 22 जिल्हे आहेत. हॉलमार्किंग अनिवार्य होण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील जवळपास 19 जिल्ह्यांचा समावेश आहे.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today

पुढील बातम्या