सोनं झालं थोडं महाग आणि चांदी स्वस्त, 'हे' आहेत गुरुवारचे दर

सोनं झालं थोडं महाग आणि चांदी स्वस्त, 'हे' आहेत गुरुवारचे दर

Gold, Silver - जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर महागड्या धातूंच्या किमतीत घसरण झाली असली तरीही दिल्ली सराफा बाजारात सोनं वधारलंय. आज ( 1 ऑगस्ट ) सोनं 15 रुपयांनी वाढलंय. त्याचा दर 35,795 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. तर चांदी 590 रुपयांनी कमी झालीय. तिची किंमत 41,530 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची घसरण झालीय. न्यूयाॅर्कमध्ये सोनं 0.60 टक्के घसरून 1405.13 डाॅलर प्रति औंस आहे. तर चांदीची 1.55 टक्के घसरण होऊन 16.01 डाॅलर प्रति औंस झालीय.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची पहिली पसंत लंडन, 'हे' आहे मुंबईचं स्थान

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केलीय. पण त्यांनी सांगितलं की भविष्यात ते कपात करणार नाहीत. तसंच, चीन आणि अमेरिकेत असलेल्या ट्रेड वाॅरवर उपाय शोधण्याच्या बैठकीत काही निष्पन्न निघालं नाही. म्हणूनच महाग धातू आणि कच्च्या तेलाची घसरण झालीय.

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! HDFC नं कमी केले व्याजदर, 'इतकं' स्वस्त EMI

सोन्याचे दर

दिल्लीत 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,795 रुपये झालीय. तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 35,625 रुपये प्रति 10 ग्रॅम झालीय. चांदी 590 रुपयांनी कमी झालीय. तिची किंमत 41,530 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.गिन्नी सोन्याची किंमत 27,500 रुपये प्रति 8 ग्रॅमवर स्थिर राहिलीय. चांदीचा लिवाली भाव 84,000 रुपये आणि बिकवाली भाव 85,000 रुपये प्रति शेकडा राहिला.

आता 8वा वेतन आयोग नाही, 'या' पद्धतीनं वाढणार पगार

पुढील काही महिन्यात म्हणजेच दिवाळीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर 1 हजार 500 डॉलरवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील दरांवर होऊ शकतो. त्यामुळे देशातील सोन्याचा दर दिवाळीपर्यंत 36 हजारच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर चांदीचे दर 42 हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरावर फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याज दर, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेला तणाव या सर्व गोष्टींचा परिणाम होऊ शकतो असं जाणकारांचं मत आहे.

VIDEO : उदयनराजेंमुळे शिवेंद्रराजे भाजपात गेले ? शरद पवारांनी केला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: gold
First Published: Aug 1, 2019 05:57 PM IST

ताज्या बातम्या