Home /News /money /

Gold Price Today: 9512 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, वाचा काय आहे लेटेस्ट भाव

Gold Price Today: 9512 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं, वाचा काय आहे लेटेस्ट भाव

Gold Rate Silver Price Today 30 December 2021: सोन्याचे दर आज रेकॉर्ड स्तरापेक्षा 9512 रुपये प्रति तोळाने स्वस्त आहेत. त्यामुळे सध्या तुमच्याकडे सोनेखरेदीची चांगली संधी आहे

    मुंबई, 30 डिसेंबर:  सोन्याचांदीच्या दरात आजही घसरण (Gold Price Today 30 December 2021) पाहायला मिळाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या वेडिंग सीझनमध्ये जर तुम्ही सोनेखरेदीचा विचार करत असाल तर सध्या तुमच्याकडे चांगली संधी आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा 98 रुपयांनी तर चांदीचे दर 699 रुपयांनी (Gold and Silver Rates Today) कमी झाले आहेत. काय आहे सोन्याचांदीचा आजचा दर दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 98 रुपयांची किरकोळ घसरण झाल्यानंतर दर 46,688 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात सोनं 46,786 रुपये प्रति तोळावर होतं.  तर चांदीच्या दरात 699 रुपयांची घसरण झाल्यानंतर आज दर 60,024 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात चांदी 60,723 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. हे वाचा-Business: घरच्या घरी सुरु करा फ्रोझन मटारचा व्यवसाय ; कसा? ते घ्या जाणून सोन्याची शुद्धता कशी तपासायची? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या