Home /News /money /

लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यातून करा भरभक्कम कमाई, व्याजासह आता मिळेल अतिरिक्त सूट

लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्यातून करा भरभक्कम कमाई, व्याजासह आता मिळेल अतिरिक्त सूट

लॉकरमध्ये सोने ठेवणे सुरक्षित तर मानले जाते, पण यावर कोणताही अतिरिक्त लाभ किंवा व्याज मिळत नाही. मात्र गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमअंतर्गत यावर देखील व्याज मिळवता येईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळतील.

    नवी दिल्ली, 07 ऑक्टोबर : लॉकरमध्ये सोने किंवा चांदी ठेवणे सुरक्षित तर मानले जाते, पण यावर कोणताही अतिरिक्त लाभ किंवा व्याज मिळत नाही. त्याचप्रमाणे लॉककरच्या किंमती वाढल्या की तुम्हाला तो खर्च देखील करावा लागतो. अशावेळी तुम्ही आरबीआय निर्धारित बँकांमध्ये सोने ठेवून व्याज कमावू शकता. त्याचप्रमाणे सोन्याचे मुल्य वाढल्यानंतरही तुम्हाला फायदा होईल. आरबीआयच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमअंतर्गत (Gold Monetization Scheme) या सोन्यावर देखील व्याज मिळवता येईल. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती मिळतील. ही सुविधा बँकेच्या फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit) सारखी आहे, ज्यामध्ये तुम्ही अतिरिक्त सोने डिपॉझिट कराल आणि मॅच्यूरिटी वेळी तुम्हाला व्याज मिळेल. तुमच्याकडे सोन्याचे मुल्य प्राप्त करण्याचा देखील पर्याय असेल, जो मॅच्यूरिटीवेळी सोन्याच्या बाजारभावावर आधारित असेल. यावर तुम्हाला त्याच दराने व्याज मिळेल, ज्या दरावर तुम्ही सोने डिपॉझिट केले होते. तुमचे सोने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकेची असेल. या योजनेतील महत्त्वाचे मुद्दे 1. गोल्ड एफडी (Gold FD) या RBI च्या स्कीममध्ये कोणताही गुंतवणूक करू शकतो. जॉइंट आधारावर देखील गोल्ड एफडी काढता येते (हे वाचा-मोठी बातमी! भारतीय कंपनीने जिंकली PepsiCo विरोधातील केस, 15 वर्ष सुरू होता खटला) 2. याअंतर्गत सोन्याची नाणी, गोल्ड-बार देखील स्विकारले जातील. सोने डिपॉझिट करताना यामध्ये अन्य कोणताही धातू असला नाही पाहिजे. 3. कमीतकमी 30 ग्रॅम सोने यामध्ये डिपॉझिट करता येईल. यासाठी जास्तीत जास्त मर्यादा नाही आहे 4. तुम्ही 1 वर्ष ते 15 वर्षांसाठी सोने डिपॉझिट करण्याासाठीची टर्म निवडू शकता. 1 ते 3 वर्षाच्या कालावधीला शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD) म्हटले जाते. तर 5 ते 7 वर्षाच्या डिपॉझिटला  मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (MTGD)आणि 12 ते 15 वर्षांसाठी गोल्ड डिपॉझिट केले तर त्याला लॉन्ग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (LTGD) म्हटले जाते. किती मिळेल व्याज? - STBD मध्ये एका वर्षापर्यंत 0.50 टक्के वार्षिक व्याज मिळेल. 1 ते 2 वर्षासाठी हे व्याज 0.55 टक्के आणि 2 ते  3 वर्षासाठी हे व्याज 0.60 टक्के वार्षिक असेल. (हे वाचा-नोटांमधून देखील पसरू शकतो कोरोना, RBI ने सांगितले महत्त्वाचे उपाय) -मीडियम आणि लाँग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिटसाठी व्याजदर 2.25 टक्के वार्षिक असेल. -ठेवीदाराकडे वार्षिक व्याज मिळण्यासाठी दोन पर्याय असतील. एक म्हणजे तुम्हाला वर्षाच्या अखेरीस व्याज मिळते किंवा मॅच्युरिटीच्या वेळी. ठेवीच्या वेळी, यापैकी एक व्याज निवडावे लागेल. -यामध्ये ठेवीदारास अकाली पैसे काढण्याचा पर्यायही मिळेल. एसटीबीडी अंतर्गत 1 वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. यानंतर, काही पेनल्टी भरल्यानंतर पैसे काढले जाऊ शकतात. -एमटीजीडी अंतर्गत 3 वर्षानंतर व्याजावर पेनल्टी भरल्यानंतर कधीही विड्रॉल करता येते. (हे वाचा-15 ऑक्टोबरपासून उघडणार सिनेमागृहं, सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी) -एलटीजीडी अंतर्गत 5 वर्षानंतर व्याजावर पेनल्टी भरल्यानंतर कधीही विड्रॉल करता येईल. टॅक्समध्ये सवलत आरबीआयच्या या योजनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमवर कॅपिटल गेन्स टॅक्स, वेल्थ टॅक्स किंवा इनकम टॅक्समध्ये सवलत मिळते. डिपॉझिट केलेल्या सोन्याचे मुल्य वाढले तरी यावर कोणताही कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागत नाही. व्याजामुळे होणाऱ्या कमाईवर देखील हा लागू होणार नाही. मॅच्यूरिटीवर त्याच फॉर्ममध्ये तुम्हाला सोने मिळेल, ज्या फॉर्ममध्ये तुम्ही डिपॉझिट केले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Money

    पुढील बातम्या