भारतात सोन्याची मागणी घटली, 10 महिन्यात 9 टक्क्यांनी कमी झाली आयात

भारतात सोन्याची मागणी घटली, 10 महिन्यात 9 टक्क्यांनी कमी झाली आयात

गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून सोन्याची आयात घटली आहे. गेल्याच वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोन्याची आयात वाढली होती. मात्र पुन्हा डिसेंबरमध्ये 4 टक्क्यांनी तर जानेवारीमध्ये 31.5 टक्क्यांनी आयातीत घट झाली

  • Share this:

नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी : भारतात सोन्याच्या मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते जानेवारी दरम्यान देशात सोन्याची आयात साधारण 9 टक्क्यांनी घसरली आहे. 24.64 अरब डॉलर म्हणजेच 1.74 लाख कोटी रुपयांपर्यंत आयात घसरली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवाडीनुसार या आधीच्या आर्थिक वर्ष 2018-19मध्ये 27 अरब डॉलरची आयात करण्यात आली होती. सोन्याची (Gold)  आयात कमी झाल्यामुळे देशातील व्यापारी तूट (Trade deficit) देखील कमी झाली आहे. एप्रिल-जानेवारी दरम्यान ही व्यापारी तूट 133.27 अरब डॉलर होती तर एकवर्ष आधी 163.27 अरब डॉलर होती. गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून सोन्याची आयात घटली आहे. गेल्याच वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सोन्याची आयात वाढली होती. मात्र पुन्हा डिसेंबरमध्ये 4 टक्क्यांनी तर जानेवारीमध्ये 31.5 टक्क्यांनी आयातीत घट झाली.

(हेही वाचा- 'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज)

भारतामध्ये सर्वाधित प्रमाणात सोनं आयात केलं जातं. दागिने घडवण्यासाठी सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात केली जाते. साधारण 800 ते 900 टन सोनं देशात आयात होतं. सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10 टक्क्यानी वाढवून 12.5 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे.

(हेही वाचा- RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस)

उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा दावा आहे की, या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्या आयात दर वाढवल्यामुळे शेजारच्या देशात आपलं उत्पादन वाढवत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जानेवारी दरम्यान दागिन्यांची निर्यात 1.45 टक्क्यांनी घसरून 25.11 अब्ज डॉलरवर गेली. तर देशाची सोन्याची आयात 2018-19 मध्ये सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 32.8 अब्ज डॉलरवर गेली आहे.

अन्य बातम्या

मोबाइलवर बोलण्यासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम, हे आहे कारण

आयकर विभागाच्या ‘या’ इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं PAN होणार रद्द!

स्टॉक संपवण्यासाठी HYUNDAI गाड्यांवर खास ऑफर, होऊ शकतोा 2.50 लाखांपर्यंतचा फायदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2020 06:24 PM IST

ताज्या बातम्या