नवी दिल्ली, 21 मार्च : चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या 11 (एप्रिल - फेब्रुवारी) महिन्यात सोन्याची आयात 3.3 टक्क्यांनी घसरुन 26.11 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती मिळाली आहे. सोन्याच्या आयातीचा परिणाम देशाच्या चालू खात्यातील तूटवर होतो. गेल्या आर्थित वर्षात यात काळात सोन्याची आयात 27 अब्ज डॉलर होती. आकडेवारीनुसार, सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशातील व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात व्यापार तूट 84.62 अब्ज डॉलर्सवर गेली, जी एक वर्षापूर्वी 151.37 अब्ज डॉलर्स होती.
भारत जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. दागिन्यांच्या उद्योगाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी सोन्याची आयात केली जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो.
दागिन्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात यावरील आयात शुल्क कमी करुन 7.5 टक्के केलं आहे. तसंच त्यावर 2.5 टक्के कृषी संरचना आणि विकास उपकर लावण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यात रत्न किंवा दागिन्यांची निर्यात 33.86 टक्के घसरुन 22.40 अब्ज डॉलरवर गेली आहे.
फेब्रुवारीमध्ये सोन्याची आयात वाढून 5.3 अब्ज डॉलरवर पोहचली आहे, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 2.36 अब्ज डॉलर होती. एप्रिल-फेब्रुवारीदरम्यान चांदीची आयातही 70.3 टक्क्यांनी घसरुन 78.07 कोटी डॉलरवर पोहचली आहे.
रेकॉर्ड स्तरावरुन 22 टक्क्यांनी घसरले सोन्याचे दर -
सोन्याची Spot Gold Price याच्या रेकॉर्ड स्तरावरुन 22 टक्के खाली आली आहे. गेल्या वर्षी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 57 हजारपर्यंत गेला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड स्तर होता. परंतु आता सोनं रेकॉर्ड स्तरावरुन 11 हजारांपर्यंत खाली आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.