Home /News /money /

भाववाढीमुळे पहिल्या सहामाहीत सोन्याच्या आयातीत घट

भाववाढीमुळे पहिल्या सहामाहीत सोन्याच्या आयातीत घट

जगभरात जितके देश सोन्याची आयात करतात, त्या मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारत वर्षभरात जवळपास 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो.

  मुंबई, 18 ऑक्टोबर : वाणिज्य मंत्रालयाने (Ministry of Commerce) जारी केलेल्या डेटानुसार, सोन्याची आयात (Gold Imports) करेंट फिस्कल ईयरच्या पहिल्या सहामाहीमध्ये (एप्रिल - सप्टेंबर) 57 टक्क्यांनी घसरली आहे. या घसरणीनंतर आता सोन्याची आयात 6.8 अब्ज डॉलरवर पोहचली आहे. कोरोना काळात, मागणीत झालेल्या घसरणीमुळे सोन्याची आयात कमी झाली आहे. देशाच्या चालू खात्यातील तूट (current account deficit -CAD) वर सोन्याच्या आयातीचा परिणाम होतो. पहिल्या सहामाहीत 15.8 अब्ज डॉलर किंमतीची सोन्याची आयात - पहिल्या सहामाहीत देशात 15.8 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 1,10,259 कोटी रुपयांची सोन्याची आयात झाली होती. यावर्षी एप्रिल-सप्टेंबरदरम्यान, चांदीची आयातही कमी झाली होती. आयात आणि निर्यातीत जे अंतर असतं, त्यालाच Current Account Deficit (CAD) म्हणतात. एप्रिल - सप्टेंबरमध्ये CAD मध्ये घट होऊन तो 24.33 अब्ज डॉलरवर आला. जो यापूर्वी, याच काळात 88.92 अब्ज डॉलर होता. वाचा - दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई भारतात दरवर्षी इतकी होते सोन्याची आयात - जगभरात जितके देश सोन्याची आयात करतात, त्या मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारत वर्षभरात जवळपास 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी इंडस्ट्रीची (jewelery industry) मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वाधिक सोन्याची आयत केली जाते. वाचा - तुमच्याकडे आहे 'ही' 10 रुपयांची नोट? घरबसल्या 25 हजार कमवण्याची संधी करेंट फिस्कल ईयरच्या पहिल्या सहामाहीत रत्न आणि ज्वेलरीची निर्यात (Export) 55 टक्के घसरुन 8.7 अब्ज डॉलर होती.

  वाचा - ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक

  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Gold

  पुढील बातम्या