Home /News /money /

Gold बाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पीयूष गोयल यांचे संकेत

Gold बाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; पीयूष गोयल यांचे संकेत

रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगांसंबंधी शुल्क आणि करांबाबत देण्यात आलेल्या सूचनांवर वित्त मंत्रालय विचार करत असल्याचं सांगितलं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं.

  नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : रत्न आणि दागिन्यांच्या उद्योगांसंबंधी (Gems and Jewellery Industry) शुल्क आणि करांबाबत देण्यात आलेल्या सूचनांवर वित्त मंत्रालय (Finance Ministry) विचार करत असल्याचं सांगितलं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी गुरूवारी सांगितलं. रत्न आणि दागिने निर्यात जाहिरात परिषदचे (Gems and Jewellery Export Promotion Council) अध्यक्ष कोलिन शाह यांनी, सोन्यावरील आयात शुल्क (Import Duty) 12.5 टक्क्यांनी कमी करून 4.5 टक्के आणि हिऱ्यावर 7.5 टक्क्यांवरून 2.5 टक्के करण्याचं सुचवलं आहे. रत्न आणि दागिने उद्योगाकडून आलेल्या शुल्कासंबंधी सूचना अर्थ मंत्रालयाच्या विचाराधीन - देशात शुल्क ढाचा अतिशय जास्त असल्याचं, उद्योग मंडळाच्या सीआयआयच्या रत्न आणि दागिने संमेलनाला संबोधित करताना, कोलिन शाह यांनी सांगितलं. या शुल्कातील कमीबाबत ज्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यावर अर्थ मंत्रालय विचार करत असल्याचं गोयल म्हणाले. या क्षेत्राबद्दल वित्तिय संस्थांमध्ये विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता - या उद्योगात अनियमितता आढळून आली आहे. ज्याचा दुर्देवाने त्यांच्या विश्वासार्हतेवर आणि विशेषत: आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याचं गोयल यांनी सांगितलं. हा उद्योग, या क्षेत्राच्या वित्तीय संस्थांमध्ये विश्वास निर्माण करणारी स्थिती तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बाजावू शकतो, असंही ते म्हणाले. (वाचा - गाड्यांच्या रजिस्ट्रेशन ट्रान्सफर नियमांमध्ये होणार हे मोठे बदल) बँका आणि त्यांच्या अधिकाऱ्यांसह काम करून आज उद्योगास भेडसावणाऱ्या अर्थसहाय्याची समस्या आपण सोडवू शकतो. उद्योगात सुव्यवस्थित व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी, उद्योगाने स्व-नियमन, धोरण आणि कार्यपद्धतींचा विचार केला पाहिजे, असंही गोयल म्हणाले.

  (वाचा - तुमच्या कारचा इन्शोरन्स संपलाय का? लगेचच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड)

  दागिन्यांची निर्यात, निर्यातीवेळी सीमा शुल्क स्थानकांवर कर परतावा, ई-कॉमर्स आणि कुरियरद्वारे छोट्या पॅकेटमध्ये निर्यातीची परवानगी यांसारखे मुद्दे वेळोवेळी शाह यांनी समोर आणल्याचं गोयल यांनी सांगितलं. या सर्व बाबींवर विचार केला जाणार असल्याचंही ते म्हणाले.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Gold

  पुढील बातम्या