Gold Rates Today : इतिहासात पहिल्यांदाच एवढं महाग झालं सोनं, का वाढले दर?

Gold Rates Today : इतिहासात पहिल्यांदाच एवढं महाग झालं सोनं, का वाढले दर?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशात सोन्याचे भाव चांगलेच वधारले आहेत. हे दर इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशात सोन्याचे भाव चांगलेच वधारले आहेत. हे दर इतिहासातले सर्वात जास्त दर आहेत. रुपया कमजोर झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तेजी आल्याने दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 953 रुपयांनी महाग झालं. एक किलो चांदीचे दर 586 रुपयांनी वाढले.

HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांनुसार, चीनमधल्या कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जोखीम वाढते तेव्हा सोन्यामधली गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते.

सोन्याचे नवे दर (Gold Rate on 24th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 44 हजार 472 रु. प्रतितोळा झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 682 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.80 डॉलर प्रतिऔंस झाले.

(हेही वाचा : 'मायक्रोसॉफ्टशी भागीदारीसाठी आम्ही उत्सुक', मुकेश अंबानी-सत्या नडेला यांचा संवाद)

चांदीचे नवे दर (Silver Rate on 24th February 2020)

सोमवारी चांदीच्या दरातही तेजी पाहायला मिळाली. चांदीची किंमत 49 हजार 990 रु. प्रतिकिलो झाली.

का वाढले सोन्याचे दर ?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, रुपया कमकुवत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय किंमतींमध्ये मजबुती आल्यामुळे 24 कॅरट सोन्याचे भाव आतापर्यंतचे सर्वोच्च झाले.

(हेही वाचा : अलर्ट! मार्च महिन्यात सलग 6 दिवस बंद राहणार बँका, आधीच करून घ्या तुमची कामं)

कोरोना व्हायरसचा परिणाम

चीनबरोबरच दक्षिण कोरिया, मध्यपूर्व आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ माजली आहे. अनेक देशांतून कोरोना व्हायरसबद्दल अलर्ट आले आहेत. त्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारातंही चिंतेचं वातावरण आहे.

=============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Feb 24, 2020 04:51 PM IST

ताज्या बातम्या