Home /News /money /

सरकारच्या तिजोरीपेक्षा पाचपट सोनं! जगभरात भारताचा नंबर कितवा?

सरकारच्या तिजोरीपेक्षा पाचपट सोनं! जगभरात भारताचा नंबर कितवा?

जगात सगळ्यात जास्त सोन्याचा खजिना अमेरिकेकडे आहे. या देशाकडे 8 हजार 133 टन सोनं आहे.

    नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, असं म्हटलं जातं पण काळ बदलला, हा खजिना जगभरातल्या लोकांनी लुटून नेला पण इथल्या डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोनं सापडतं आहे. आता उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात 3 हजार 350 टन सोनं मिळालं आहे. याची किंमत 12 लाख कोटींच्या घरात आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारताकडे सुमारे 626 टन सोन्याचा खजिना आहे. सोनभद्रमध्ये मिळालेला खजिना या सोन्यापेक्षा 5 पट जादा आहे. यामुळे भारत आता सोन्याचं वैभव असलेल्या पहिल्या 3 देशांमध्ये गणला जाईल. भारताच्या भूशास्त्रीय सर्वेक्षणात या डोंगरांमध्ये 3 हजार टनांपेक्षा जास्त सोनं दडलं असल्याची शक्यता आहे. सोनांचलच्या या डोंगरांमध्ये लोहखनिजही मोठ्या प्रमाणात असावं, असा अंदाज आहे. भारताचा नंबर कितवा? भारतासह जगभरातल्या सेंट्र बँका सोन्याची खरेदी करतात. 2019 मध्ये जगभरातल्या 15 सेंट्रल बँकांनी सुमारे 650 टन सोन्याची खरेदी केली आहे. सोप्या शब्दांत सांगायचं तर दरवर्षी 57 टन सोनं विकत घेतलं गेलं. जगात सगळ्यात जास्त सोन्याचा खजिना अमेरिकेकडे आहे. या देशाकडे 8 हजार 133 टन सोनं आहे. दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि त्याखालोखाल इटलीचा क्रमांक लागतो. चीनचा क्रमांक सहावा आहे तर भारताचा नववा क्रमांक आहे. जीएसआयची टीम 2005 सालापासून सोन्याच्या शोधासाठी काम करत होती. टीमने सोनभद्र भागातील केलेला अभ्यास आणि संशोधनानंतर तिथं सोनं असल्याची माहिती दिली होती. आणि 2012 मध्ये त्यांनी या माहितीला पुष्टी दिली होती. (हेही वाचा : पाकिस्तानला आणखी एक दणका, FATF ने पुन्हा टाकलं करड्या यादीत) सोन्याचा ई लिलाव GSI ने दिलेल्या माहितीनुसार हरदी भागामध्ये 646.15 किलो तर सोनं पहाडीमध्ये 2943.25 टन सोन्याचा साठा आहे. उत्तर प्रदेश सरकारने या सोनं असलेल्या भूभागाच्या वाटपासंदर्भातील प्रकिया वेगात सुरू केली आहे. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या ब्लॉकचे लिलाव केले जाणार आहेत. यासाठी सरकारने सात सदस्यांची समितीही स्थापन केली आहे. या संपूर्ण क्षेत्राची जिओ टॅगिंग केली जाणार आहे आणि त्याचा रिपोर्ट भूगर्भ आणि खाणकाम संचलनालय लखनऊ यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. ========================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Gold, Gold bond

    पुढील बातम्या