Home /News /money /

Gold Forecast: 2022 मध्ये सोन्याला येणार झळाळी, 55 हजार रुपयांवर पोहोचणार दर

Gold Forecast: 2022 मध्ये सोन्याला येणार झळाळी, 55 हजार रुपयांवर पोहोचणार दर

यावर्षी सोन्याची झळाळी पुन्हा परतण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पँडेमिकची भीती आणि महागाईच्या चिंतेमुळे 2022 मध्ये सोन्याचे दर 55 हजार रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 01 जानेवारी: वर्ष 2020 च्या मानाने गेल्या वर्षी 2021 मध्ये सोन्याचे प्रदर्शन खास नव्हते. मात्र यावर्षी सोन्याची झळाळी पुन्हा परतण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पँडेमिकची भीती आणि महागाईच्या चिंतेमुळे 2022 मध्ये सोन्याचे दर (Gold Rate in 2022) 55 हजार रुपये प्रति तोळाच्या स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये सोन्याचे दर पोहोचले होते ऑल टाइम हाय स्तरावर 2020 साली सोन्याचे दर कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान तेजीत आले होते. यावेळी सोन्याचा दर 56200 रुपये प्रति तोळाच्या आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. मात्र 2021 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये सोन्यामध्ये कमजोरी पाहायला मिळाली. सोन्यात एवढी चांगली उसळी या वर्षात पाहायला मिळाली आहे. 2021 च्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर 46,874 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. हे वाचा-WazirXनंतर क्रिप्टोकरन्सीच्या आणखी एका कंपनीवर टॅक्सचोरी प्रकरणी DGGIची छापेमारी सोन्याच्या सेंटिमेंटमध्ये सुधारणा कॉमट्रेंड्झचे सह-संस्थापक आणि सीईओ गणशेखर त्यागराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी सोन्याची कमकुवत कामगिरी पाहायला मिळाली कारण म्हणजे इक्विटी मार्केटमध्ये लिक्विडिटी अधिकप्रमाणात पाहायला मिळाली. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होण्याच्या भीतीमुळे अनेक युरोपीय देशांमध्ये नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान कोविड निर्बंधांची शक्यता वाढली आहे. अमेरिकन नागरिकांनी हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये प्रवास करताना बूस्टर डोस घेणे, मास्क घालणे आणि सावधगिरी बाळगण्याचे आवाहन यूएस आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. 29 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 1,791 डॉलर प्रति औंस होता, तर भारतात एमसीएक्सवर सोने 47,740   रुपये प्रति तोळावर होते.  त्यागराजन म्हणाले, 'शेअर बाजारातील घसरण आणि सोन्याची इन्फ्लेशन हेजची स्थिती त्याला खालच्या स्तरावर सपोर्ट देत आहे. तसेच भू-राजकीय ताणतणाव असल्यास सोन्याबाबत सेंटिमेंट सुधारू शकते.' हे वाचा-शेतकऱ्यांसाठी नववर्ष गोड, मोदी सरकारने पाठवली 20000 कोटींपेक्षाही जास्त रक्कम 2022 च्या पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीचा काय आहे अंदाज? त्यागराजन म्हणाले, 'आम्ही 2022 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याचे दर $1700-1900 प्रति औंसच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा ठेवतो आणि दुसऱ्या सहामाहीत हे दर $2,000 ची पातळी ओलांडण्याची अपेक्षा करतो. देशांतर्गत बाजारातील MCX वर, 2022 च्या उत्तरार्धात किंमती 45,000-50,000 च्या श्रेणीत राहतील आणि दुसऱ्या सहामाहीत दर 55,000 च्या वर जाऊ शकतील.'
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, New year

    पुढील बातम्या