Home /News /money /

विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, भारतात होईल हा परिणाम

विदेशी बाजारात सलग दुसऱ्या दिवशी उतरले सोन्याचे दर, भारतात होईल हा परिणाम

आर्थिक सुधारणांची अपेक्षा वाढल्यामुळे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक कमी करू लागले आहेत.

    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : आर्थिक सुधारणांची अपेक्षा वाढल्यामुळे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. गुंतवणूकदार सोन्यामधील गुंतवणूक कमी करू लागले आहेत. त्यामुळे विदेशी बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. परदेशी बाजार बंद होताना सोने जवळपास 1.73 टक्के आणि चांदी 4.33 टक्क्यांनी घसरले आहे. तर आज देशांतर्गत वायदे बाजारात एमसीएक्सवर सोन्याचांदीमध्ये सुरुवातीला काहीशी तेजी होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. कारण रुपया घसरला आहे. बुधवारी सोन्याच्या किंमती घसरल्या एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 52,928 रुपये प्रति तोळावरून कमी होत 52,314 रुपये प्रति तोळा झाल्या होत्या. प्रति तोळा सोन्याच्या दरात 614 रुपयांची घसरण झाली होती. मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 51500 रुपये प्रति तोळापेक्षा खाली आले होते. बुधवारी मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 51024 रुपये प्रति तोळा आहेत. (हे वाचा-दीड लाखांपर्यंत पगार? कोरोना संकटात ही कंपनी देणार 20000 महिलांना नोकरी) बुधवारी सोन्याप्रमाणेच चांदीचे दरही कमी झाले होते. दिल्लीतील सराफा बाजारात एक किलोग्रॅम चांदीचे द 73,001 रुपयांवरून कमी होत 71,202 रुपये प्रति किलो झाले. चांदीमध्ये प्रति किलो 1799 रुपयांची घसरण झाली होती. तर बुधवारी मुंबईमध्ये चांदीचे दर प्रति किलो 66356 रुपये होते. आता पुढे काय? जाणकारांच्या मते यूरो आणि इतर युरोपियन चलनांमध्ये झालेल्या घसरणीमुळे डॉलरला सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात असे म्हटले आहे की, आर्थिक सुधारणांची अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात सातत्याने तेजी वाढल्याने सोन्यासाठी ही बाब नकारात्मक ठरत आहे. मात्र अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावामुळे देखील सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता देखील आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या