मुंबई, 16 जानेवारी: देशामध्ये कोरोना संक्रमणाची (
Coronavirus Latest Update in India) स्थिती अजूनही कमी झालेली नाही आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना पँडेमिकमुळे (
Coronavirus Pandemic) लोकं त्रस्त झाली आहेत. हा काळ अनेकांसाठी आर्थिक तंगीचा असला तरी या काळात सोन्याच्या दागिन्यांची (
Gold Demand Hike in India) मागणी वाढली आहे. सोन्याची आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात (एप्रिल ते डिसेंबर 2021) दुपटीपेक्षा अधिक होऊम 38 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशात मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. चीननंतर भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते.
लग्नसराईमुळे वाढली मागणी
तज्ज्ञांच्या मते आयातीमध्ये ही वाढ लग्नसराईत सोन्यावरील खर्च वाढल्याने झाली आहे. कोरोना काळात साधारण वर्षभर लग्नसमारंभ रखडले होते. मात्र ही परिस्थिती सुधारल्यानंतर मोठ्या प्रमाणात धुमधडाक्यात लग्न पार पडली. या काळात दागिन्यांची मागणीही तेवढ्यात प्रमाणात वाढली, परिणामी सोन्याची आयातही वाढली आहे.
हे वाचा-Budget 2022 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सध्याचा टॅक्स स्लॅब किती? चेक करा
सोन्याच्या दागिन्यांची निर्यात वाढली
दुसरीकडे देशातून होणारी सोन्याच्या दागिन्यांची निर्यातही वाढली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत हिरे आणि दागिन्यांची निर्यात 71 टक्क्यांनी वाढून 2.9 कोटी डॉलर झाली आहे. आयात वाढण्यामागे हे देखील कारण असू शकते.
एप्रिल-डिसेंबर 2020 मध्ये सोन्याची आयात 16.78 अब्ज डॉलर होती. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये सोन्याची आयात वाढून 4.8 अब्ज डॉलर झाली होती. जी एका वर्षापूर्वी याच महिन्यात 4.5 अब्ज डॉलर होती. त्याचप्रमाणे आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात चांदीची आयात वाढून दोन अब्ज डॉलर झाली आहे, जी आधीच्या आर्थिक वर्षात समान कालावधीसाठी 76.2 कोटी डॉलर होती.
हे वाचा-Home Loan घेताना लक्षात ठेवा या गोष्टी, घर खरेदी करताना येणार नाहीत अडचणी
आयातीमुळे तूट वाढली
सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्यातील तूटीवरही परिणाम होतो. आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सोन्याच्या आयातीत झालेल्या वाढीमुळे व्यापार तूट $142.44 अब्ज झाली आहे, जी मागील आर्थिक वर्षात याच कालावधीमध्ये $61.38 अब्ज होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत देशाची चालू खात्यातील तूट $9.6 अब्ज किंवा GDPच्या 1.3 टक्के होती.
सोन्याचे लेटेस्ट दर
दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव 93 रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी आज चांदीच्या दरात 59 रुपयांची उसळी नोंदवण्यात आली. सोन्याचे दर 47,005 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. तर चांदीचा भाव 59 रुपयांनी वाढून 61,005 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.