Home /News /money /

Gold Price Today: दिवाळीआधी सोन्याचांदीची झळाळी उतरली, खरेदीपूर्वी तपासा आजचा भाव

Gold Price Today: दिवाळीआधी सोन्याचांदीची झळाळी उतरली, खरेदीपूर्वी तपासा आजचा भाव

Gold Silver Price, 03 November 2021: दिवाळीच्या खरेदीदरम्यान सोन्याचांदीच्या किंमतीत बुधवारी घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज 3 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) 46,411 रुपये प्रति तोळावर आहेत.

    नवी दिल्ली, 03 नोव्हेंबर: दिवाळीच्या खरेदीदरम्यान सोन्याचांदीच्या किंमतीत बुधवारी घसरण झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात आज 3 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) 46,411 रुपये प्रति तोळावर आहेत. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही आज (Silver Price Today) घसरण नोंदवण्यात आली आहे. आधीच्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. तर चांदीचा भाव 62,950 रुपये प्रति किलोवर बंद झाला. HDFC सिक्योरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सोन्याचा भाव 375 रुपयांनी घसरून 46,411 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. आधीच्या व्यवहारात सोन्याचा भाव 46,786 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. चांदीचा भावही 898 रुपयांनी कमी होऊन 62,052 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हे वाचा-भारतात पेट्रोल शंभरीपारच! 21 दिवसात 8 रु. वाढ,पाकिस्तानात दर 60 रुपयांपेक्षा कमी रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 29.67% नी वाढली, सप्टेंबर महिन्यात 23259 कोटी रुपये होती निर्यात सप्टेंबर 2021 मध्ये रत्ने आणि दागिन्यांची निर्यात 29.67 टक्क्यांनी वाढून 23,259.55 कोटी रुपये झाली. वर्षभरापूर्वी याच महिन्यात हा आकडा 17,936.86 कोटी रुपये होता. सप्टेंबर 2019 मध्ये, 23,491.20 कोटी रुपयांची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात झाली. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल (जीजेईपीसी) ने एका निवेदनात म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एप्रिल-सप्टेंबरमध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 134.55 टक्क्यांनी वाढून1,40,412.94 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे वाचा-34 रुपयांचा शेअर पोहोचला 130 रुपयांवर, तुमच्याकडे आहे का हा Stock? मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today

    पुढील बातम्या