मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : सोनं महागलं, चांदीच्या दरातही 1000 रुपयांची वाढ, पाहा आजचे दर

Gold Price Today : सोनं महागलं, चांदीच्या दरातही 1000 रुपयांची वाढ, पाहा आजचे दर

राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 398 रुपयांनी वाढून 47,762 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 1,033 रुपयांनी वाढून 61,147 रुपये प्रतिकिलो झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. या दिवसांत सोन्याच्या खरेदीत वाढ होते. मात्र गेल्या काही दिवसाची सोन्याची चमक महागली आहे. आजही सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली आहे. भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 17 डिसेंबर 2021 रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली. आज सोन्याच्या दरात 398 रुपयांची (Gold Price today) वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरात 1033 रुपये प्रति (Silver Price Today) किलोने मोठी वाढ झाली आहे.

राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 398 रुपयांनी वाढून 47,762 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 1,033 रुपयांनी वाढून 61,147 रुपये प्रतिकिलो झाला. मागील ट्रेडिंग सत्रात सोने 47,364 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 60,114 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सोन्याचा नवा भाव कसा पाहायचा? (How to check gold price)

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

First published:

Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Investment