Elec-widget

खूशखबर! सोनं झालं स्वस्त पण चांदी महाग, हे आहेत आजचे दर

खूशखबर! सोनं झालं स्वस्त पण चांदी महाग, हे आहेत आजचे दर

नवरात्रीच्या सणासुदीच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घटले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 58 रुपयांनी कमी झाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : नवरात्रीच्या सणासुदीच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घटले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 58 रुपयांनी कमी झाले. आज सोन्याचे भाव 38 हजार 198 रुपये प्रतितोळा एवढे झाले.सोन्याच्या दरात घसरण होत असली तरी चांदीचे भाव मात्र वाढले आहेत. चांदी 47 हजार 580 रुपये प्रतिकिलो झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 460 डॉलर प्रतिऔंस झाली तर चांदीची किंमत 16.95 डॉलर प्रतिऔंस आहे.

रुपया वधारला, सोनं स्वस्त

HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्यानुसार, रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये घट झाली. अमेरिका आणि चीन यांच्यातला तणाव कमी झाल्यामुळे डॉलरचा भाव वधारला. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल राहिलेला नाही.

आता 1 रुपयातही करू शकतो सोन्याची खरेदी

Loading...

Paytm सारख्या ई वॉलेट कंपन्या आता एक रुपयात सोनं खरेदी करण्याची संधी देत आहेत. तुम्ही सोन्याची खरेदी केली तर सोनं लॉकरमध्ये ठेवलं जातं आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा सोन्याची होम डिलिव्हरी केली जाते. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही एक रुपयापासून हळूहळू गुंतवणूक वाढवू शकता. या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो.

========================================================================================

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 1, 2019 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...