सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये झाला मोठा बदल, हे आहेत आजचे दर

सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये झाला मोठा बदल, हे आहेत आजचे दर

रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोनं 87 रुपयांनी महाग झालं. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात बुधवारी सोनं 87 रुपयांनी महाग झालं. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली. चांदीचे भाव 450 रुपयांनी वाढले आहेत.सोन्याचे दर प्रतितोळा 38 हजार 842 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1 हजार 489 रुपये प्रतिऔंस झाले. चांदीचे दर17.82 डॉलर प्रतिऔंस झाले आहेत.

चांदीची चमक वाढली

सोन्याप्रमाणेच चांदीलाही झळाळी आली आहे. चांदीचा भाव 450 रुपयांनी वाढून 47 हजार 770 रुपये प्रतिकिलो झाला. HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, रुपया कमकुवत झाल्यामुळे सोन्याने उसळी घेतली आहे.

(हेही वाचा : मोदी सरकार लाखो नोकरदारांना देणार खूशखबर, ग्रॅच्युटीचा नियम बदलणार?)

वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीला सोनं खरेदी करता त्याला स्पॉट प्राइस असं म्हणतात. शहरांमधल्या सराफ संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याआधी सोन्याचे भाव ठरवतात.हे ठरवताना व्हॅट, लेव्ही तसंच उत्पादनासाठी येणारा खर्च हे सगळं विचारात घेतलं जातं. त्या शहरात ठरलेल्या भावानेच दिवसभर सोनं विकलं जातं.

या कारणामुळेच वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. स्पॉट मार्केटमध्ये सोन्याची किंमत त्याच्या शुद्धतेच्या आधारावर ठरते. 22 कॅरट आणि 24 कॅरटच्या सोन्याच्या किंमती वेगवेगळ्या असतात.

=========================================================================================

VIDEO : 'जे ठरलंय तेवढंच मिळणार, जास्त मागणी करू नका', भाजप खासदाराचा शिवसेनेला अल्टीमेटम

Published by: Arti Kulkarni
First published: October 30, 2019, 7:42 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading