सोनं आणि चांदीचे भाव वाढले, हे आहेत आजचे दर

सोनं आणि चांदीचे भाव वाढले, हे आहेत आजचे दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 118 रुपयांनी वाढले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 118 रुपयांनी वाढले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 293 रुपयांनी वाढ झालीय. तज्ज्ञांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने देशात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.

दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचे भाव 118 रुपयांनी वाढून 38 हजार 678 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 463 डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचे भाव 16. 85 डॉलर प्रतिऔंस झाले.

चांदीच्या दरात 293 रुपयांची वाढ होऊन हा भाव 45 हजार 263 रुपये प्रतिकिलो झाला.

HDFC सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, अमेरिका आणि चीनमधल्या व्यापारविषयक चर्चेतली अनिश्चतता आणि घरगुती स्टॉक मार्केटची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यामुळे सोन्याच्या किंमती वधारल्या. त्याचवेळी डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला.

मागच्या आठवड्यात अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारविषयक चर्चा होण्याच्या अपेक्षेने सोन्याचा भाव घसरले होते. पण सोमवारी सोन्याच्या किंमतीत तेजी आली.

सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमार्क ज्वेलरी खरेदी करा. ज्या दागिन्यांवर हॉलमार्क असतो ते सोनं शुद्ध आहे असं मानलं जातं.

======================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Nov 11, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या