नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर : सोन्याच्या किंमतींमध्ये दोन दिवसांनी घसरण झालीय. भारतीय रुपयामध्ये थोडी वाढ झाल्यामुळे गुरुवारी सराफा बाजारात सोनं स्वस्त झालं. सोन्याप्रमाणेच चांदीचे भावही कमी झालेत. सोन्याच्या किंमतीत घट होऊन हे दर 39 हजार 7 रुपये प्रतितोळा झालेत. मंगळवारी सोन्याचे भाव वाढले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 472.70 डॉलर प्रतिऔसं आणि चांदीचे दर 17. 10 डॉलर प्रतिऔंस झाले.चांदीचे भाव 45 हजार 830 रुपये प्रतिकिलो झाले.मंगळवारी चांदीचे भाव 45 हजार 873 रुपये प्रतिकिलो होते.
का झाली घसरण?
HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याला मागणी वाढल्यामुळे आता काही दिवसांत बाजारात तेजी येईल.पुढच्या 6 महिन्यांत सोन्याच्या किंमती वाढत राहतील, असं तज्ज्ञांचं मत आहे.
(हेही वाचा : नोकरी जाण्याच्या भीतीने तिने केली आत्महत्या, IT क्षेत्रावर कर्मचारी कपातीचं संकट)
भारतीय स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लगार सोमैया कांति घोष म्हणाले, पुढच्या काही दिवसांत सोन्याचे भाव खाली येण्याची चिन्हं नाहीत.जागतिक बाजाराची स्थिती पाहिली तर या आर्थिक वर्षातल्या शेवटच्या सहा महिन्यांत सोन्याचे दर चढते राहतील. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याला मागणी असल्यामुळेही सोनं महाग होणार,असा अंदाज आहे.
=======================================================================================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा