मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: 10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं, तपासा मुंबईसह विविध शहरातील आजचा भाव

Gold Price Today: 10000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे सोनं, तपासा मुंबईसह विविध शहरातील आजचा भाव

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळते आहे.

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळते आहे.

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळते आहे.

नवी दिल्ली, 25 जून: सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण पाहायला मिळते आहे. यासह सोन्याचे दर गेल्या दोन महिन्यांच्या निचांकी पातळीवर आहेत. सातत्याने घसरणीनंतर शुक्रवारी सोन्याचा भाव (Gold Price Today) 40 रुपये प्रति तोळाने वाढला आहे. या वाढीनंतर 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 46,190 रुपये झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर आज 47,190 रुपये प्रति तोळा आहेत. गुड रिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून निचांकी पातळीवर राहिल्यानंतर सोन्याचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. दरम्यान सोन्यावर विविध राज्यात वेगवेगळा टॅक्स असल्याने प्रत्येक राज्य आणि शहरात दर वेगवेगळे असतात.

MCX वर काय आहेत सोन्याचे दर? (Gold Rate on MCX)

शुक्रवारी भारतात सोन्याचे दर (Gold Price on 25 June 2021) स्थिर आहेत. कारण अमेरिकन चलनवाढीच्या आकडेवारीपेक्षा सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत 41 रुपयांनी (0.09%) वाढले आहेत, यामुळे सोन्याचे दर 46,911 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 46870 रुपये होते. तर जुलैच्या चांदीची वायदे किंमत 67,894 रुपये प्रति किलो आहे. चांदीची वायदे किंमत आधीच्या सत्रात 67,733 रुपये प्रति किलो होती. रॉयटर्सच्या मते अमेरिकन सोन्याची वायदे किंमत 0.2 टक्क्यांच्या घसरणीनंतर 1,773.60 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.

हे वाचा-SBI Alert: व्हॅक्सिन सर्टिफिकेट सोशल मीडियावर शेअर करताय तर सावधान!

सर्वोच्च स्तरापेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त आहेत दर

गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटकाळात सोन्यामध्ये अनेकांनी गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर सोन्याचे दर 56191 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आज एमसीएक्सवर ऑगस्टच्या सोन्याची किंमत 46,911 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा 10,000 रुपयांनी स्वस्त आहेत.

हे वाचा-HDFC Life पॉलिसीहोल्डर्सना देणार 2180 कोटी रुपयांचा बोनस! तुम्हाला मिळणार का?

दिल्ली-मुंबईसह महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे भाव

गुड रिटर्न्स वेबसाइटच्या मते, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,190 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 47,190 रुपये प्रति तोळा आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर  44,400 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 48,440 रुपये प्रति तोळा आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,150 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 50,250 रुपये प्रति तोळा आहेत. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,660 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 49,210 रुपये प्रति तोळा  आहेत.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver, Silver prices today