सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची चमक कमी, हे आहेत आजचे दर

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याची किंमत 210 रुपयांनी वाढली आहे. त्याचवेळी चांदीच्या किंमतींमध्ये घसरण झाली.

सोन्याचा दर प्रतितोळा 39 हजार 75 रुपये झाला आहे. चांदीची किंमत 46 हजार 490 रुपये प्रतिकिलो झालीय.

का वाढले सोन्याचे भाव ?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. रुपयाच्या दरात घसरण झाली की लोक सोन्यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यामुळे सोन्याचे दर वाढतात.जागतिक बाजारात डॉलरमध्ये चढउतार झाले की सोन्याच्या दरातही बदल झालेला पाहायला मिळतो.

(हेही वाचा : खूशखबर : SBI ग्राहकांना देणार भेट, होमलोनचा EMI होणार कमी)

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

=====================================================================================

VIDEO : तिकीट कापल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Oct 4, 2019 06:39 PM IST

ताज्या बातम्या