Home /News /money /

अमेरिकेमुळे महागलं सोनं- चांदी, हे आहेत आजचे दर

अमेरिकेमुळे महागलं सोनं- चांदी, हे आहेत आजचे दर

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 जानेवारी : सोन्यामध्ये तेजीचं प्रमाण आजही कायम होतं. आठवडा संपताना सोन्याचे दर 752 रुपये प्रतितोळा वाढले. त्याचवेळी चांदीच्या भावात 960 रुपयांची वाढ झालीय. तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचे जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू ओढवल्याने आखाती देशात तणाव वाढलाय. या पार्श्वभूमीवर सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा कल वाढलाय. त्यामुळे सोनं महाग झालंय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची भाव 40 हजार 652 रुपये प्रतितोळा झालाय. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत 1 हजार 547 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 18.20 डॉलर प्रतिऔंस झाली. सोन्याप्रमाणेच चांदीचे भाव 48,870 रुपये प्रतिकिलो झाले. वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात. हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात. (हेही वाचा : खूशखबर! हेल्थ इन्शुरन्सबद्दलचे नियम बदणार, सामान्यांना होणार फायदा) किंमतीबद्दल राहा सावधान सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी. पक्कं बिल घ्या सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत. शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा. ================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Gold, Money

    पुढील बातम्या