खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीची झळाळीही उतरली

खूशखबर! सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, चांदीची झळाळीही उतरली

आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 233 रुपयांनी घटले.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात एक तोळा सोन्याचे भाव 233 रुपयांनी घटले.

एक किलो चांदीचा भाव (Silver Prices)157 रुपयांनी कमी झाला. सोन्याच्या दरात शुक्रवारी तेजी आली होती पण आता मात्र हे भाव घसरले आहेत. चीनमधल्या कोरोना व्हायरसवर उपचार सुरू आहेत आणि याची लागण रोखली जाऊ शकते, असं वक्तव्य चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ्य आयोगाने केल्यानंतर सोन्याच्या किंमती खाली आल्या.

सोन्याचे नवे दर (Gold Price on 17th February 2020)

दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 41,565 रुपये प्रतितोळा झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 579 डॉलर प्रति औंस आणि चांदी 17.74 डॉलर प्रति औंस झालीय.

चांदीचे नवे दर (Silver Rate on 17th February 2020)

औद्योगिक मागणी कमी झाल्याने चांदीही स्वस्त झालीय. सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 47 हजार 170 रुपये किलो झाली.

(हेही वाचा : मोठी बातमी! 31 मार्चच्या नंतरही PAN आणि आधार कार्ड करू शकता लिंक, ही आहे अट)

चांदी का झाली स्वस्त?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने बाजारात तेजी आली आणि त्यामुळे सोनं -चांदीच्या किंमती कमी झाल्या.

10 महिन्यात सोन्याची आयात घटली

भारतात सोन्याची आयात मागच्या वर्षीच्या जुलैपासूनच घटली. मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये यात सकारात्मक वाढ झाली. त्याचवेळी डिसेंबरमध्ये 4 टक्के आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यात 31.5 टक्के घट झाली.

(हेही वाचा : SBI देतंय स्वस्त घर आणि दुकान खरेदीची संधी, उरला अगदी कमी अवधी)

===================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Feb 17, 2020 05:57 PM IST

ताज्या बातम्या