या 2 कारणांमुळे घसरले सोन्याचे दर, चांदीही झाली स्वस्त

या 2 कारणांमुळे घसरले सोन्याचे दर, चांदीही झाली स्वस्त

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 161 रुपयांनी घसरले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झालीय.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 161 रुपयांनी घसरले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही घसरण झालीय. चांदीचे भाव 426 रुपयांनी कमी झालेत. HDFC सिक्युरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, कमी मागणीमुळे हे दर घसरले आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 38 हजार 718 रुपये प्रतितोळा झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 456 डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 16.84 डॉलर प्रतिऔंस झाली.

चांदीची चमक उतरली

एक किलो चांदीची किंमत 46 हजार 155 रुपयांनी कमी होऊन 45 हजार 730 रुपयांवर आली.

का घटले सोन्याचे दर?

HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अ‍ॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, डॉलर मजबूत झाल्याने आणि चीनमधून सकारात्मक मॅन्युफॅक्चरींग PMI डेटा आणि PMI डेटा आल्यानंतर जागतिक स्तरावर सोन्याचे दर घसरले आहेत.

सोनंखरेदीचे नियम बदलले

सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर BIS हॉल मार्किंग सक्तीचं करण्यात येणार आहे. (BIS Hallmarking for Gold Jewelry)केंद्र सरकार 15 जानेवारी 2020 ला अधिसूचना जारी करणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी 2021 पासून BIS हॉलमार्किंग सक्तीचं होईल.

नियम पाळला नाही तर होणार शिक्षा

हा नियम पाळला नाही तर 1 लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वेगवेगळ्या शहरांतल्या सराफ संघटना बाजार सुरू होण्यापूर्वी एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवतात.त्यामुळे देशभरात प्रत्येक शहरांत सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

=================================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 2, 2019, 6:03 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading