Elec-widget

सोन्याला नवी झळाळी, चांदीची चमकही वाढली, हे आहेत आजचे दर

सोन्याला नवी झळाळी, चांदीची चमकही वाढली, हे आहेत आजचे दर

लग्नसराईच्या धामधुमीत सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झालीय. सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर आता BIS हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर :  लग्नसराईच्या धामधुमीत सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झालीय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 80 रुपयांनी वाढून 38 हजार 789 रुपये प्रतितोळा झालेत तर चांदीचे दर 101 रुपयांनी वाढून 45 हजार 826 रुपये प्रतिकिलो झाले. लग्नाच्या हंगामामुळे सोन्याला मागणीही वाढलीय.

सोनंखरेदीचे नियम बदलले

सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर BIS हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात येणार आहे. (BIS Hallmarking for Gold Jewelry)केंद्र सरकार 15 जानेवारी 2020 ला अधिसूचना जारी करणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी 2021 पासून BIS हॉलमार्किंग सक्तीचं होईल.

केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया सांगतात, सोन्याची खरेदी करताना कधीही हॉलमार्क ज्वेलरी घेतली पाहिजे. हे हॉलमार्किंग ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड करत असते. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुणवत्तेची चाचणी ही संस्था करते. ज्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल ते सोनं शुद्ध असतं. सोन्याचे दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही घेतलं पाहिजे.

(हेही वाचा : पैसे कमवण्याची नामी संधी, या बँकेचा IPO झाला जाहीर)

Loading...

नियम पाळला नाही तर होणार शिक्षा

हा नियम पाळला नाही तर 1 लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वेगवेगळ्या शहरांतल्या सराफ संघटना बाजार सुरू होण्यापूर्वी एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवतात.त्यामुळे देशभरात प्रत्येक शहरांत सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

सोन्याचं बिल आवश्यक

सोन्याची खरेदी करताना बिल अवश्य घ्या. इनकम टॅक्स रिटर्न भरताना या बिलाच्या मदतीने तुम्ही सोन्याचा सोर्स जाणून घेऊ शकता. जेव्हा तुम्ही दाखल केलेल्या इनकम टॅक्स रिटर्न्सची तपासणी होते तेव्हा बिलाचा फायदा होऊ शकतो.

==================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldmoney
First Published: Dec 3, 2019 04:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com