खूशखबर! कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

खूशखबर! कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सोनं झालं स्वस्त, हे आहेत आजचे दर

कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 130 रुपयांनी घटले.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव 130 रुपयांनी घटले. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही घसरल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घटल्याचा हा परिणाम आहे. चांदीचे भाव 45 हजार 80 रुपये प्रतिकिलो झाले.

दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचे भाव 38 हजार 550 रुपये प्रतितोळा झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 1 हजार 453 डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचे भाव 16. 81 डॉलर प्रतिऐऔंस झाली.

वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे भाव

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

तुम्ही सराफाकडून जे सोनं खरेदी करता त्याच्या किंमती स्पॉट प्राइस या न्यायाने ठरतात. बहुतांश शहरात सराफांच्या संघटनेचे सदस्य मिळून बाजार सुरू होण्याच्या वेळी सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरात सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

(हेही वाचा : इथे आधार कार्डचा नंबर वापरताना घ्या खबरदारी, नाहीतर होईल 10 हजार रुपयांचा दंड)

हॉलमार्क असलेलेच दागिने घ्या

ज्या दागिन्यांना हॉलमार्क लावलेला असेल ते दागिने शुद्ध सोन्याचे मानले जातात.

किंमतीबद्दल राहा सावधान

सोन्याचे दागिने कधीही 24 कॅरटचे बनत नाहीत. ते 22 कॅरटचे असतात आणि 24 कॅरट सोनं स्वस्त असतं. त्यामुळे ही किंमत 22 कॅरटच्या हिशोबानेच द्यायची असते. सोन्याची शुद्धता आणि किंमत बिलावर लिहून घ्यावी.

पक्कं बिल घ्या

सोन्याचं नाणं किंवा दागिने खरेदी करताना कच्चं बिल घेऊ नका. त्यामुळे तेव्हा पैसे वाचतात पण नंतर नुकसान होतं. बऱ्याच वेळा सोनं परत देताना सराफच कच्चं बिल ओळखू शकत नाहीत.

शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्या

सोन्याची खरेदी करताना सोन्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका. प्रमाणपत्रात दिलेला सोन्याच्या कॅरटचा दर्जाही तपासून पाहा.

=========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: November 12, 2019, 5:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या