दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

दिवाळीच्या आधी सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर

दिवाळीच्या दिवसांत सोनं महाग झालं आहे. चांदीलाही चांगलीच झळाळी आलीय. मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 40 हजार 200 रुपये प्रतितोळा झालेत.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर : दिवाळीच्या दिवसांत सोनं महाग झालं आहे. चांदीलाही चांगलीच झळाळी आलीय. मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याचे दर 40 हजार 200 रुपये प्रतितोळा झालेत.

सोनं-चांदीचे आजचे दर

22 कॅरेट - 36, 980 रु.

23 कॅरेट - 38, 290 रु.

24 कॅरेट - 40, 200 रु.

चांदी - 46 हजार 500 रु. किलो

दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी सोन्याची किंमत 38 हजार 810 रुपये प्रतितोळा होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 1 हजार 488 डॉलर प्रतिऔंस होती तर चांदीची किंमत 17. 64 डॉलर प्रतिऔंस होती. HDFC सिक्युरिटीज चे सिनिअर अ‍ॅनॅलिस्ट तपन पटेल यांच्या मते, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्याने सोनं महाग झालं आहे.

वेगवेगळ्या शहरांत सोन्याचे वेगवेगळे भाव

तुम्ही ज्या किंमतीला ज्वेलरकडून सोन्याची खरेदी करता ती स्पॉट प्राइस असते. बहुतांश शहरांमध्ये सराफा असोसिएशनचे सदस्य मिळून सोन्याचे भाव ठरवतात. त्यामुळे वेगवेगळ्या शहरांत सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमतही वेगवेगळी असते.

==============================================================================

उदयनराजेंसारखी कॉलर उडवत 'या' नेत्याने काढली निकालाआधीच मिरवणूक, पाहा हा VIDEO

First published: October 23, 2019, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading